बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असतं. त्याचं कारण म्हणजे चित्रपटातील भव्यता. रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, गंगुबाई काठीयावाडी यांसारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर ते आता मोठा पडदा बाजूला सारून ओटीटी माध्यमाकडे वळत आहेत. मोठ्या पडद्यावर सर्वत्र त्यांच्या चित्रपटांचा नेहमीच डंका वाजत असताना त्यांनी ओटीटी माध्यमाची का निवड केली हे त्यांनी आता सांगितलं आहे.

संजय लीला भन्साळी हे लवकरच त्यांची ‘हीरामंडी’ ही वेब सिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या वेब सिरीज चा घोषणेपासूनच याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती. नुकतीच या वेब सिरीजची पहिली झलक प्रेक्षकांच्या समोर आली. हीरामंडीच्या फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हासह सर्व अभिनेत्री रॉयल अवतारात दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांचं नाव दिसतं. या वेब सिरीजची घोषणा केल्यानंतर अनेकांनी त्यांना यावर चित्रपटही होऊ शकतो असं म्हटलं. परंतु कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता त्यांनी वेब सिरीज बनवायचाच निर्णय घेतला.

आणखी वाचा : प्रसाद ओक लवकरच दिसणार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत? प्रसिद्ध दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

टीझर लॉन्च इव्हेंटमध्ये ते म्हणाले, “आतापर्यंत आम्ही अनेक मोठे चित्रपट बनवले आणि ते माझ्या हातून स्वाभाविकपणे घडत गेलं. परंतु आता ओटीटी माध्यमामध्ये आल्यावर मी खरोखरच एक मोठा प्रोजेक्ट केला. ‘हीरामंडी’ हा माझा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. सिरीज पाहताना प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा अनुभव येईल. त्यामुळे ही सिरीज बनवता नाही मला काही वेगळं करावं लागलं नाही. मी जे एखादा चित्रपट बनवताना करतो तेच सगळं सिरीज बनवतानाही केलं.”

पुढे ते म्हणाले, “या सिरीजसाठी मी 8 भाग बनवले. एखाद्या चित्रपटासाठी आपण जितका वेळ देऊ त्यापेक्षाही जास्त वेळ सिरीज बनवताना द्यावा लागला, पण आम्ही सर्वांनी हे खूप एन्जॉय केलं. मी कोणतेही कलाकृती डोक्याने नाही तर मनाने बनवतो. आणि हीरामंडी साठी माझ्या मनात विशेष जागा आहे. कोविडनंतर प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. जे दिग्दर्शक म्हणतात की त्यांना प्रेक्षकांची आवड नीट कळली आहे ते वेड्यांच्या जगात जगत असतात. खरं तर दिग्दर्शकच प्रेक्षकांची आवड निवड बदलण्यासाठी कारणीभूत असतो.”

हेही वाचा : आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ ऑस्करसाठी सज्ज; राजामौलींच्या ‘RRR’शी होणार स्पर्धा

दरम्यान संजय लीला भन्साळी पहिल्यांदा वेब सीरिजचं दिग्दर्शक करत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर ते ‘हीरामंडी’तून देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची कथा मोठ्या पडद्यावर मांडताना दिसणार आहेत. यात सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहगल यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप शेअर करण्यात आलेली नाही.

Story img Loader