सारा अली खान बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच सारा आपल्या वैयक्तिक कारणांमुळेही नेहमी चर्चेत असते. मध्यंतरी साराचे क्रिकेटर शुबमन गिलबरोबर नाव जोडले गेले होते. त्याअगोदर सारा अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत असल्याचं सांगण्यात येत होतं. दोघांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, काही दिवसांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता साराने कार्तिक आर्यनबरोबरच्या ब्रेकअपबद्दल मौन सोडून प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Koffee With Karan 8 : सारा अली खान आणि अनन्या पांडेने ‘या’ एकाच अभिनेत्याला केलंय डेट, करण जोहरने केली पोलखोल

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सीझनच्या पहिल्या भागात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने हजेरी लावली होती तर दुसऱ्य़ा भागात देओल बंधू म्हणजे सनी देओल आणि बॉबी देओलने हजेरी लावली होती. आता या सीझनच्या तिसऱ्या भागात सारा अली खान आणि अभिनेत्री अनन्या पांडेने हजेरी लावली आहे. या भागात सारा आणि अनन्या अनेक गुपिते उलगडणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या कार्यक्रमात साराने कार्तिक आर्यनबरोबरच्या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे.

हेही वाचा- Video: शुबमन गिल-सारा तेंडुलकरच्या डेटिंगवर सारा अली खानने केलं शिक्कामोर्तब? ‘त्या’ प्रश्नावर म्हणाली, “संपूर्ण जग…”

करण जोहरने सारा अली खानला विचारले की, “तू आणि अनन्या एकत्र काम करत आहात, तुम्ही दोघीही मैत्रिणी आहात. तुम्ही दोघींनी कार्तिक आर्यनला डेट केले आहे. तुमच्या दोघींचं कार्तिकबरोबर चांगलं पटतं, मग तुमच्यासाठी हे सगळं सोप्प होतं की अवघड?

करणच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत सारा म्हणाली, “सोप्पं नव्हतं. जेव्हा माझं एखाद्याबरोबर नातं तयार होतं, मग ती मैत्री असो, व्यावसायिकरित्या असो किंवा प्रेमाचं; तेव्हा मी स्वत:ला त्या नात्यात पूर्णपणे गुंतवून घेते. आजची परिस्थिती आणि उद्याची परिस्थिती वेगळी असू शकते. पण, एकाच क्षेत्रात राहून एकमेकांबरोबर बोलायचं नाही किंवा एकमेकांसमोर कधीच यायचं नाही, असं नाही होऊ शकत.”

हेही वाचा- बारबालेवर कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या तेलगीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यामागील कारणांचा आढावा घेणारी जबरदस्त सीरिज

सारा अली खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सारा लवकरच अनुराग बसू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती ‘ए वतन मेरे वतन’ या वेब सीरिजमध्येही झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये तिने स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan talk on breakup with kartik aaryan in koffee with karan actress said it isn t always easy dpj
Show comments