Scam 2003 – The Telgi Story Teaser : ‘स्कॅम १९९२’ नंतर देशातील सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कहाणी आता प्रेक्षकांना सीरिजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमधून वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “सर्वांगसुंदर असं नाटक…”, सैराट फेम रिंकू राजगुरुने पाहिलं आयुष्यातील पहिलं नाटक, फोटो शेअर करत म्हणाली…

‘स्कॅम २००३’ हा भारतातील सर्वात मोठा स्टॅम्प पेपर घोटाळा म्हणून ओळखला जातो. या सीरिजची संपूर्ण कथा अब्दुल करीम तेलगीवर आधारित असणार आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचे कथानक पत्रकार आणि वृत्तनिवेदक संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या हिंदी पुस्तकातून घेण्यात आले आहे.

हेही वाचा : Video: नितीन देसाईंना अखेरचा निरोप देताना पत्नी व मुलांना कोसळलं रडू, आमिर खानने कुटुंबाला दिला धीर

स्टॅम्प पेपर छापण्यासाठी लागणारी यंत्रे, ही यंत्रे विकत घेण्यासाठी तेलगीने बँका, विमा कंपन्या आणि इतर अनेकांची कशाप्रकारे फसवणूक केली. ३०० हून अधिक लोकांना कामावर ठेवले. या सगळ्यात जवळपास ३० हजार कोटींचा घोटाळा झाला होता. यावर आधारित सीरिजचे कथानक असेल असे टीझर पाहिल्यावर लक्षात येते. टीझरमधील “मला पैसे कमावण्याची हौस नाही कारण, पैसे कमावले नाहीतर बनवले जातात” हा संवाद लक्ष वेधून घेतो.

हेही वाचा : रस्त्यावर आढळला तमिळ अभिनेत्याचा मृतदेह, कमल हसन यांच्याबरोबर केलं होतं काम

‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही सीरिज २ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होईल. या सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. सीरिजमघ्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका अभिनेते गगन देव रियार साकारणार आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scam 2003 the telgi story teaser out now series released on 2nd sep on sony liv sva 00