२००३ मध्ये देशात सर्वात मोठा स्टॅम्प पेपर घोटाळा झाला होता. या घोटाळ्याची कहाणी आता प्रेक्षकांना सीरिजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. अब्दुल करीम तेलगीच्या घोटाळ्याने संपूर्ण देशाला धक्का दिला. या बहुचर्चित सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’मध्ये अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकार दिसत आहेत. हे कलाकार कोण आहेत जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “माझ्या सासूचं लग्न!”, मिताली मयेकरने सासूबाईंना दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा; म्हणाली, “एवढा मोठा निर्णय…”

‘स्कॅम २००३’ या सीरिजचे संपूर्ण कथानक अब्दुल करीम तेलगीवर आधारित आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचे कथानक पत्रकार आणि वृत्तनिवेदक संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या हिंदी पुस्तकातून घेण्यात आले आहे. या सीरिजच्या ट्रेलरमध्ये अनेक मराठी कलाकार दिसत आहेत. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि भरत जाधव या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

हेही वाचा : “आता मी तुझं लग्न लावतोय…”, सिद्धार्थ चांदेकरची आई पुन्हा विवाहबंधनात, फोटो आला समोर

‘स्कॅम २००३’ सीरिजच्या ट्रेलरमधील “देशाची अर्थव्यवस्था कुबेराचा खजिना असेल तर स्टॅम्प पेपर त्याची चावी आहेत”, ‘पैसे कमावले नाहीतर बनवले जातात’ (पैसा कमाया नही बनाया जाता है) यांसारखे अनेक संवाद लक्ष वेधून घेतात. तेलगी जवळपास ३० हजार कोटींचा घोटाळा करतो यानंतर त्याला अटक करण्याचे आदेश दिले जातात यामध्ये त्याला कोण-कोण कशी मदत करतात याचा उलगडा १ सप्टेंबरला होणार आहे. प्रेक्षकांना सोनी लिव्हवर ही सीरिज पाहता येणार आहे.

हेही वाचा : “आईच्या मृत्यूला आदिल जबाबदार, राखी सावंतच्या भावाचे गंभीर आरोप; म्हणाला, “तिचे अश्लील व्हिडीओ काढून…”

अभिनेता शशांक केतकरने या सीरिजसाठी खास फोटो शेअर केला आहे. “‘स्कॅम २००३’चा ट्रेलर पाहून मी आनंदी झालो” असे त्याने म्हटले आहे. दरम्यान, ट्रेलरच्या शेवटी प्रेक्षकांना भरत जाधवची झलक पाहायला मिळत आहे. सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी तुषार हिरानंदानी यांनी सांभाळली आहे. सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका अभिनेते गगन देव रियार साकारणार आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scam 2023 trailer out bharat jadhav shashank ketkar and these marathi stars will play role in scam 2003 the telgi story sva 00