नेटफ्लिक्सवरील काही थरारक डार्क थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, जिथे प्रत्येक वळणावर नवं रहस्य उलगडतं. या चित्रपटांच्या कथा फक्त मनाचा ठोका चुकवणाऱ्या नसून, त्यांच्यातील निर्मितीची कुशलता प्रेक्षकांना भारावून टाकते. कथानकातील रहस्य, उत्कृष्ट अभिनय व अद्वितीय पटकथा यांमुळे प्रेक्षक हे चित्रपट पाहताना पूर्णपणे गुंतून जातात. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या अशाच काही चित्रपटांवर एक नजर टाकूया…

सेक्टर ३६ (Sector 36)

‘सेक्टर ३६’ हा सिनेमा २००६ च्या नोएडा सीरियल मर्डरवर आधारित आहे. हा सिनेमा एका पोलिसाच्या संघर्षाची कथा सांगतो. त्याचं स्वतःचं मूल बळी ठरल्यानं तो गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. अंगावर काटा आणणारा हा थ्रिलर त्या परिसरातील गुन्ह्यांचं अंधारलेलं रहस्य उलगडतो; ज्यामुळे प्रेक्षक भयभीत होतात. विक्रांत मॅसी, दीपक डोब्रियाल, आकाश खुराना, दर्शन जरीवाला यांसारख्या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य निंबाळकर याने केले आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
Underrated Thriller Movies on OTT
‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
13 Reasons Why Dead Boy Detectives netflix webseries
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चुकवू नका OTT वरील ‘या’ सस्पेंस थ्रिलर आणि कॉमेडी वेब सीरिज, पाहा यादी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
suspense thriller movies on ott
OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी

हेही वाचा…OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ भयंकर भयपट, एकटं बसून पाहायची वाटेल भीती; पाहा यादी…

h

मेरी ख्रिसमस (Merry Christmas)

‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात ख्रिसमसच्या संध्याकाळी दोन अनोळखी व्यक्तींची योगायोगानं भेट होते. एका स्त्रीच्या दु:खद कहाणीमुळे प्रभावित होऊन एक पुरुष तिच्या मदतीला येतो. काही काळानंतर ते तिच्या घरी पोहोचतात आणि तिथे एक गुन्हा घडल्याचं त्यांच्या लक्षात येतं. त्या पुरुषाच्या पूर्वेतिहासामुळे त्याला गुन्ह्यात अडकण्याची भीती असते; पण नव्यानं ओळख झालेल्या स्त्रीविषयीची आपुलकीची भावना तो लपवू शकत नाही. अखेरीस तिचा अपराध स्वीकारत, तिच्या रक्षणाची जबाबदारी तो घेतो. कतरिना कैफ, विजय सेतुपती, अश्विनी कळसेकर, ल्युक केनी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी तयार केला आहे.

डार्लिंग्ज (Darlings)

‘डार्लिंग्ज’ हा आई-मुलीच्या नात्यावर आधारित थरारक चित्रपट आहे. मुलगी एका हिंसक नात्यात अडकलेली असते आणि तिच्या आईला तिच्या पतीला धडा शिकवायचा असतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. आलिया भट्ट, शेफाली शाह, विजय वर्मा, रोशन मैथ्यू यांचे जबरदस्त अभिनय आणि जस्मित के. रीन यांचं उत्कृष्ट दिग्दर्शन यांमुळे हा चित्रपट अधिक उत्कंठावर्धक ठरतो.

हेही वाचा…New Ott Release : रोमँटिक-थ्रिलर, आणि अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचरची मेजवानी, या वीकेंडला बघा ओटीटीवरील ‘या’ नव्या कलाकृती

मॉम (Mom)

‘मॉम’ हा चित्रपट एका आईच्या धाडसी प्रवासाची कथा मांडतो; जी तिच्या सावत्र मुलीवर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून स्वतःचा मार्ग निवडते. श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना यांचा उत्कृष्ट अभिनय यातील सशक्त भूमिका अधिक जिवंत बनवतो.

जाने जान (Jane Jan)

‘जाने जान’ हा चित्रपट एका एकट्या आईची कथा सांगतो; जी तिच्या आणि तिच्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करते. तिच्या मदतीला आलेला एक शिक्षक तिच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यात मदत करतो. करीना कपूर खान, जयदीप अहलावत, विजय वर्मा यांच्या दमदार अभिनयासोबतच सिनेमा थरारक अनुभव देतो.

हेही वाचा…या वीकेंडला OTT वर अनुभवा थरार, पाहा नेटफ्लिक्सवरील ‘या’ पाच थ्रिलर वेब सीरिज

बदला (Badla)

‘बदला’ या चित्रपटात एक आई आपल्या मुलाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी चाणाक्ष योजना आखते. तिच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या महिलेचा ती नायिका सूड घेते. अमिताभ बच्चन, तापसी पन्नू व अमृता सिंग यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हे सर्व चित्रपट त्यांच्या आकर्षक आणि रहस्यमय कथांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

Story img Loader