शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. आता जवळपास दोन महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. या चित्रपटाची कथा थोडी हटके होती, त्यामुळे चित्रपटाने चांगली कमाई केली. रोमँटिक कॉमेडी असलेला हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कुठे बघता येईल ते जाणून घेऊयात.

Video: खूपच सुंदर गातात डॉ. नेने, माधुरी दीक्षितसह गायलं रोमँटिक गाणं; व्हिडीओ पाहिलात का?

रिलीजच्या दोन महिन्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर आला आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे. प्राइम व्हिडीओने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून याची माहिती दिली आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. आता तुम्हाला हवं तेव्हा घरी बसून हा सिनेमा ओटीटीवर बघता येईल, कारण ४ एप्रिल रोजी प्राइम व्हिडीओवर चित्रपट रिलीज करण्यात आला आहे.

Video: क्रिकेटपटू पृथ्वी शॉबरोबरची ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

शाहिद आणि क्रितीसह धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात क्रितीने रोबोटची भूमिका साकारली आहे. ५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्य या चित्रपटाने १३३ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला IMDb मध्ये ६.५ रेटिंग मिळाले आहे.