Bloody Daddy Review : ‘फर्जी’सारखी जबरदस्त हीट वेब सीरिज दिल्यानंतर शाहिद कपूरकडून अपेक्षा वाढल्या होत्या. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘ब्लडी डॅडी’ने मात्र अपेक्षाभंग केला. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली होती. एकूणच ‘जॉन विक’ स्टाइलचा एक जबरदस्त ॲक्शनपट पाहायला मिळणार असं लोकांना आणि शाहिदच्या चाहत्यांना वाटलं होतं. पण हा चित्रपट वेगवेगळ्या हॉलिवूड चित्रपटांची भेसळ असलेला एक सुमार ॲक्शन थ्रिलरपट आहे.

दिल्लीत कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर गुन्हेगारी प्रचंड वाढल्याचं दाखवून त्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा सुमेर आझाद या नार्कोटीक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याभोवती फिरते जो शहरातील एका मोठ्या ड्रग लॉर्डचे ५० कोटींचे ड्रग्स जप्त करतो. त्या बदल्यात ते ड्रग्स ज्याच्या मालकीचे असतात तो सुमेरच्या मुलाला ताब्यात घेतो आणि त्याबदल्यात तो आपल्या ड्रग्सची मागणी करतो. या ड्रग्सवर आणखीनही काही लोकांचा डोळा असतो. आता हे ड्रग्स परत देऊन सुमेर आपल्या मुलाला वाचवू शकणार की नाही याभोवती हे सगळं कथानक रचण्यात आलं आहे.

chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Two people on two-wheeler died in collision with speeding car
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना
Bajrang Sonawane Allegation
Bajrang Sonawane : बजरंग सोनावणेंचा आरोप, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अजित पवारांच्या ताफ्यातील कारमधून…”

आणखी वाचा : School Of Lies Review: लहान मुलांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्याचं सुमार सादरीकरण, रटाळ कथानक अन्…

संपूर्ण चित्रपट हा एका रात्रीच्या घटनेवरच बेतलेला असल्याने चित्रपट रटाळ वाटत नाही, पण जे ट्रेलरमध्ये दाखवलं त्यापेक्षा काहीतरी भलतंच या चित्रपटातून मांडण्यात येतं. ‘स्लिपलेस नाईट’ या फ्रेंच चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक जरी असला तरी या चित्रपटात ‘जॉन विक’, ‘द डीपार्टेड’, ‘फेस ऑफ’सारख्या सुपरहीट हॉलिवूड चित्रपटांची अतिशय भ्रष्ट अशी नक्कल करण्यात आली आहे. अगदी थेट नसलं तरी बऱ्याच गोष्टी अप्रत्यक्षरित्या दाखवण्यात आल्या आहेत.

कथा, पटकथा ठीक आहे. संवादही तितके प्रभाव पाडणारे नाहीत. काही ठिकाणी ओढून ताणून विनोद निर्मितीचा प्रयत्न झाला आहे पण खरं सांगायचं झालं तर संपूर्ण चित्रपट पाहताना आपल्या चेहेऱ्यावरची माशीदेखील हलत नाही. शिवाय नार्कोटीक्स डिपार्टमेंटमध्ये काम करणारे शाहिद सारखे स्टायलिश अधिकारी पाहून बॉलिवूड आजही चित्रपट आणि त्यातील कंटेंटला किती गांभीर्याने घेतं याची प्रचिती पुन्हा आली. बाकी एवढ्या मोठ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ड्रग माफियाशी जोडलेलं दाखवणं आणि त्यावरून त्या अधिकाऱ्यांमध्ये वैमनस्य दाखवणं ही गोष्ट अली अब्बास जफरसाठी नवीन नाही. ‘टायगर जिंदा है’मध्ये त्याने थेट पाकिस्तान आणि ISI ला दहशतवादाविरुद्ध लढताना दाखवलेलं आहे. त्यामुळे अली अब्बास जफरच्या कल्पकतेबद्दल आणि दिग्दर्शनाबद्दल मी एक चकार शब्दही काढू इच्छित नाही.

चित्रपटाच्या शेवटी येणारी ॲक्शन एवढंच काय ते बघण्यालायक आहे. बाकी रॉनित रॉय आणि संजय कपूर यांची कामं चांगली झाली आहेत. राजीव खंडेलवाल आणि डायना पेंटी या दोघांची कामं विसरण्यालायक आहेत. शाहिद कपूरचं पात्र हे नार्कोटीक्स डिपार्टमेंटचा अधिकारी आहे यावर विश्वास बसत नाही आणि एकूणच हे कथानक काही केल्या आपल्याला रुचत नाही. मुलगा आणि वडील यांच्यातील नात्यालाही हा चित्रपट प्रभावीपणे सादर करण्यात अपयशी ठरतो. ज्यांच्याकडे वेळच वेळ आहे त्यांनी हा चित्रपट ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघावा, किंवा नाही पाहिलात तरी फार काही अडणार नाही.

Story img Loader