शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचे गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. अखेर काल हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवान चित्रपटगृहात जबरदस्त कामगिरी करत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होत आहेत. या चित्रपटाला शाहरुख खानच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. पहिल्या दिवशी ७५ कोटींची दणदणीत कमाई केली. त्यावरून हा चित्रपट करून प्रेक्षकांना खूप आवडला हे सिद्ध झालं आहे. त्यामुळेहा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार याबद्दल सर्वजण उत्सुक आहेत.

आणखी वाचा : Jawan sequel: ‘जवान’च्या यशानंतर येणार ‘जवान २’? चित्रपटातून मिळाली मोठी हिंट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवान हा चित्रपट प्रदर्शनानंतर ५६ – ६० दिवसानंतर म्हणजेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यासाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने निर्मात्यांशी मोठा करार केला आहे. या चित्रपटाने ओटीटी हक्क विकून प्रदर्शनाच्या आधी १०० हून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट घरबसल्या बघण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

हेही वाचा : खऱ्या आयुष्यात ‘असा’ आहे शाहरुख खान! गिरीजा ओकने केला खुलासा, म्हणाली, “त्याच्या स्वभावाबद्दल जे काही बोललं जातं ते सगळं…”

दरम्यान, शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट अखेर ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने जगभरातून १०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan starrer film jawan ott release date is out know the details rnv