बॉलिवूडचा बादशाह, किग खान व रोमान्स किंग अशी ओळख असणारा शाहरुख खान आज त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘पठाण’ आणि लगेच ‘जवान’सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या शाहरुखची क्रेझ आजही कायम आहे. त्याच्या वाढदिवशी त्याच्या मुंबईतील ‘मन्नत; बंगल्याबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यंदाही त्याच्या घराबाहेर रात्री असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्याला भेटायला आलेल्या चाहत्यांना शाहरुख बाहेर येऊन अभिवादन करतो, परंतु यंदाचा वाढदिवस शाहरुखसाठी व त्याच्या लाखों चाहत्यांसाठी खास ठरला आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘जवान’ हा चित्रपट. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला. जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली.

आणखी वाचा : ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याला धमक्या; आगामी चित्रपट ‘बस्तर’ ठरतोय निमित्त

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी आतुरतेने वाट बघत होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे. शाहरुखने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. ‘जवान’ आजपासून म्हणजेच २ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर ‘जवान’च्या एक्सटेंडेड व्हर्जनसहित हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘नेटफ्लिक्स’ने नुकतंच याचा एक खास व्हिडीओही पोस्ट केला आहे. यामध्ये शाहरुख ‘जवान’ स्टाइलमध्ये नेटफ्लिक्सला चित्रपट प्रदर्शित करण्यास भाग पाडताना दिसत आहे. वाढदिवसाचं शाहरुखच्या चाहत्यांना खास गिफ्ट म्हणून ‘जवान’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओमध्ये शाहरुखने नेटफ्लिक्सला चित्रपट लवकर प्रदर्शित करण्यासाठी वेठीस धरलेलं पाहायला मिळत आहे.

‘जवान’च्या घवघवीत यशानंतर शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘डंकी’चं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं असून येत्या २२ डिसेंबरला तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख व राजकुमार हिरानी हे प्रथमच एकत्र काम करणार आहेत. शाहरुखसह या चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखच्या वाढदिवशीच याचा पहिला टीझर प्रदर्शित होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan starrer jawan is now streaming on netflix avn