Shaitaan OTT Release: अजय देवगण अभिनीत ‘शैतान’ चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला. काळी जादू, वशीकरण यावर आधारित असलेला हा भयपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटाने जागतिक स्तरावर २१५ कोटींची कमाई केली आहे.

‘शैतान’ चित्रपटात पहिल्यांदाच अजय देवगण आणि आर माधवनची जोडी पाहायला मिळाली. आजपर्यंत नायक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आर माधवनने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊयात ‘शैतान’ ओटीटीवर कधी, कुठे व कसा पाहता येणार?

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?

‘शैतान’ चित्रपट ३ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. थरकाप उडवणारा हा चित्रपट ‘वश’ या गुजराती चित्रपटाचा रीमेक आहे. ‘वश’ १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता, परंतु हा चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. ‘वश’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जानकी बोडीवालाने ‘शैतान’मध्येसुद्धा जान्हवीचं पात्र साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

हेही वाचा… “मी मुस्लीम कुटुंबातला आहे म्हणून…”, ‘दंगल’च्या शूटदरम्यान आमिर खानला समजलं हात जोडून नमस्कार करण्याचं महत्त्व

दरम्यान, ‘शैतान’ चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, हा चित्रपट काळी जादू, वशीकरण आणि अंधविश्वासावर आधारित आहे. अजय देवगणने या चित्रपटात कबीर या नावाने पित्याची भूमिका साकारली आहे, तर आर माधवन वनराज नावाच्या खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. ‘शैतान’ चित्रपटात ज्योतिका सदाना-सर्वणन, जानकी बोडीवाला, अंगद राज यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader