नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘महाराज’ चित्रपटातून आमिर खानचा मुलगा जुनैद खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत, शर्वरी वाघसह अभिनेत्री शालिनी पांडे हिची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात तिने जयदीप अहलावतसोबत एक सेक्स सीन दिला आहे. हा सीन शूट करतानाचा अनुभव शालिनीने सांगितला आहे.
चित्रपटात शालिनीने किशोरी नावाचं पात्र साकारलं आहे, तर जयदीप अहलावतने जेजे नावाच्या महाराजाची भूमिका केली आहे. सिनेमात किशोरीला जेजेबरोबर चरण सेवेच्या नावाखाली शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं जातं. हा सीन करताना खूप घाबरली होती, असा अनुभव शालिनी पांडेने सांगितला. चित्रपटाची कथा वाचल्यावर ती पात्र साकारत असलेली किशोरी मूर्ख आहे, असं शालिनीला वाटलं होतं.
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग
या चित्रपटात जयदीपने १८०० च्या दशकातील महाराजाची भूमिका केली आहे. जेजेचं वर्चस्व असलेल्या हवेलीत तरुण स्त्रियांचं ‘चरण सेवा’ या प्रथेच्या नावाखाली शारीरिक शोषण केलं जायचं. आपल्याकडून बलात्कार होणं हे एकप्रकारे पवित्र आहे, असं त्यांना महाराजने पटवून दिलं होतं, दुसरीकडे तरुणींबरोबर घडणाऱ्या या प्रकाराकडे समाज डोळेझाक करायचा, कारण त्यांनाही ते योग्य वाटायचं.
अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…
“जेव्हा मी महाराजांसोबत तो चरणसेवेचा सीन प्रत्यक्षात शूट केला… मी तो सीन केला तेव्हापर्यंत माझ्यावर काय परिणाम झाला हे मला कळालंच नाही, कारण मी तो सीन केला आणि अचानक मी बाहेर गेले आणि मी माझ्या टीमला सांगितलं की मला बंद खोलीत राहायचं नाही. मला वेळ हवा आहे, मला थोडी ताजी हवा पाहिजे आहे, मी थोडी घाबरले होते,” असं शालिनीने ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”
शालिनी म्हणाली की तिने याबद्दल दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्राला सांगितलं. या सीनमधील सहकलाकार जयदीप अहलावतनेही तिला समजून घेतलं. या चित्रपटातील पात्र आणि खऱ्या आयुष्यातील शालिनीचे विचार खूप वेगळे आहेत असं तिने सांगितलं. पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली तेव्हा शालिनीला किशोरी हे पात्र अत्यंत मूर्ख वाटलं होतं.
“किशोरी खूप भोळी आणि गोड आहे. तिची भूमिका करण्याबद्दल जेव्हा सुरुवातीला मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा विचार केला की ती किती मूर्ख आहे. पण नंतर मला समजलं की ती मूर्ख नाही, कारण तिला चांगलं-वाईट माहितच नाही. ती परिस्थितीच तशी होती की ती करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर तिचा विश्वास होता,” असं शालिनी म्हणाली.
शालिनी पांडे ही लोकप्रिय बॉलीवूड व दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने विजय देवरकोंडाबरोबर ‘अर्जुन रेड्डी’ व रणवीर सिंगबरोबर ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटात काम केलं आहे.