एका लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो तृतीयपंथियांप्रमाणे साडी नेसून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांकडून पैसे मागताना दिसत आहे. केसात गजरा, लाल रंगाची साडी अन् मेकअप पाहून हा अभिनेता नेमका कोण आहे, हेही चाहत्यांना ओळखता आलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भारत-पाकिस्तानमधील द्वेषाचं कारण…”, गदर २ च्या ट्रेलर लाँचवेळी सनी देओलचे वक्तव्य

तृतीयपंथीय म्हणून लाल साडीत दिसणारा अभिनेता दुसरा कोणी नसून शरद मल्होत्रा ​​आहे. त्याला या अवतारात पाहून लोक थक्क झाले आहेत. शरदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मुलींसारखा मेकअप करताना आणि साडी नेसताना दिसत आहे. पूर्णपणे तयार झाल्यानंतर तो ट्रॅफिक सिग्नलवर जातो आणि एका गाडीजवळ जाऊन टाळ्या वाजवू लागतो. कारमधील व्यक्ती त्याला काही पैसे देते आणि ते पैसे घेऊन शरद ब्लाउजमध्ये ठेवतो. त्याचा हा अवतार पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

“मी आणि काजोलने किसिंग सीन केला तेव्हा अजय देवगण…”, ‘द : ट्रायल’ फेम अभिनेत्याचा खुलासा

“मी रिअल स्पेस आणि वेळेत साकारलेल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक आता अल्टवर प्रवाहित होत आहे,” असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलंय. या समुदायाप्रती खूप प्रेम आणि आदर, मला त्यांना पडद्यावर साकारण्याचा मान मिळाला असंही शरदने म्हटलं आहे.

दरम्यान, ‘हनी ट्रॅप स्क्वाड’ या मालिकेसाठी शरदने हा लूक घेतला आहे. ‘हनी ट्रॅप स्क्वाड’मध्ये शरद एका डार्क भूमिकेत दिसत आहे. या शोमध्ये तो डब्बेवाला, सरदार आणि तृतीयपंथी अशा चार वेगवेगळ्या पात्रांमध्ये दाखवण्यात आला आहे.