जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. यावर आधारित ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट २३ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट १९ एप्रिलला लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाबद्दल मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आर्टिकल ३७०’ चित्रपटात अभिनेत्री यामी गौतमने मुख्य भूमिका साकारली आहे. जबरदस्त स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाबद्दल शरद पोंक्षे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. “नेटफ्लिक्सवर आता तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने काय पावल ऊचलली? काँग्रेसने काय वाटोळं केलं ते कळेल. कोणी म्हणेल की खोटा इतिहास दाखवलाय, ज्याला जे म्हणायच ते म्हणू दे पण प्रत्येकानं पाहिला पाहिजे. आणि हो मतदान मात्र नक्की करा. राष्ट्रसर्वतोपरी,” अशी फेसबुक पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली आहे.

शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”

‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास यात प्रियामणी, अरुण गोविल, वैभव तत्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार आणि इरावती हर्षे मायादेव यांच्या भूमिका होत्या.

यामी गौतमचा ‘आर्टिकल ३७०’ ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

अगदी कमी बजेटमध्ये निर्मिती झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. अवघ्या २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८१ कोटी रुपये कमावले होते. आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती व लेखन यामी गौतमचा पती आदित्य धर याने केलं होतं.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pnkshe reaction on yami gautam film article 370 hrc