अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच तिच्या दिलखुलास अंदाजामुळे चर्चेत असते. अनेकदा ती उत्स्फूर्तपणे व्यक्त होताना दिसते. आता नुकतीच ती तिची आजी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबरोबर एका कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली होती. त्या दोघींनी मिळून एकत्र एक मुलाखत दिली. पण या मुलाखती दरम्यान दोघींमध्ये गमतीशीर वाद रंगल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा ‘गुलमोहर’ सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे. तर शर्मिला टागोर यांची नात अभिनेत्री सारा अली खानचा ‘गॅसलाइट’ सिनेमा ३१ मार्च रोजी याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने ही आजी-नातीच्या या जोडीला एकत्र बोलवण्यात आलं होतं.

आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत बोलू लागली, व्हिडीओ व्हायरल

या मुलाखती दरम्यान त्या दोघींना प्रश्न विचारण्यात आला की, “तुमच्यात सिक्रेट टॅलेंट काय आहे?” या प्रश्नाचं उत्तर देताना शर्मिला टागोर म्हणाल्या,”सीक्रेटचं तर माहीत नाही पण स्वयंपाक करणं माझं पॅशन आहे.” शर्मिला यांचे हे बोलणं ऐकून सारा अली खान आश्चर्यचकित झाली. पुढे शर्मिला टागोर म्हणाल्या, “मी नेहमी नव-नवीन रेसिपी ट्राय करते आणि वेगवेगळ्या लोकांना त्या चाखायला देते. स्वतःच्या स्वयंपाकाला 100 पैकी 40 गुण मी दिले आहेत.” इतक्यात सारा म्हणाली, “हे जवळपास नापास होण्यासारखंच आहे.” साराच हे बोलणं ऐकून शर्मिला टागोर थोडा थांबल्या आणि म्हणाल्या, “मी तुझं मत विचारलेलं नाही. मला माहित आहे की मी एक दिवस चांगला स्वयंपाक नक्कीच करेन.” त्यावर सारा म्हणाली, “बडी अम्मी तुम्ही चित्रपटांमध्येच व्यग्र रहा. जेवणाचं राहू दे.”

हेही वाचा : Shark Tank India 2: “आम्हाला मूल हवं होतं पण…” नमिता थापरने सांगितला ‘तो’ वेदनादायी अनुभव

आता त्यांची ही मुलाखत खूपच चर्चेत आली आहे. या दोघींमधलं बॉण्डिंग नेटकर यांना खूपच आवडलेलं असून या व्हिडिओवर कमेंट करत दोघींवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharmila tagor and sara ali khan gave an fun interview together rnv