संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ या वेब सीरिजची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली असून त्याचे आठ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सहा अभिनेत्री आणि इतर कलाकारांसह बनवलेली ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. चित्रपटादरम्यान अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या, त्याचे अनुभव या अभिनेत्रींनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये शेअर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयएमडीबी (IMDb) ला दिलेल्या मुलाखतीत, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल मेहता, ताहा शाह, फरदीन खान यांनी ‘हीरामंडी’ चित्रपटाबाबत काही किस्से सांगितले.

हेही वाचा… “मी शिव्या देतोय? तू काय मला धमकी…”, विक्रांत मेस्सी आणि टॅक्सीचालकाचं झालं जोरदार भांडण, व्हिडीओ व्हायरल

चित्रपटातील कठीण सीनबद्दल सांगताना रिचा म्हणाली, “स्क्रिप्ट अक्षरशः एखाद्या सूचनेसारखी आहे. माझी लज्जो ही भूमिका आहे. लज्जो या चित्रपटात एक मोठं शेवटचं नृत्य करते, परंतु तुम्हाला हे माहीत नसतं की ते आठ दिवसांत शूट केलं जाणार आहे. ते किती तणावपूर्ण, गुंतागुंतीचे, कठीण किंवा आनंददायक असेल याचीही तुम्हाला कल्पना नसते. स्क्रिप्ट वाचल्यानंतर माझी अशी उत्साही किंवा मोठी प्रतिक्रिया नव्हती.”

यालाच जोडून शर्मिन म्हणाली, “एक सीन होता, ज्यामध्ये मला चार दिवस रडायचं होतं. मला सकाळपासून ते रात्रीपर्यंत फक्त रडायचंच होतं. चौथ्या दिवसापर्यंत माझे डोळे बटाट्यासारखे झाले होते.”

हेही वाचा… मुग्धा गोडसेच्या आईला मिळाली नामांकित रेस्टॉरंटमध्ये वाईट वागणूक; अभिनेत्री म्हणाली, “माझ्या ७० वर्षांच्या आईची…”

शर्मिन पुढे म्हणाली, संजय सरांबरोबर डान्स सिक्वेन्स करणं कदाचित आव्हानात्मक आहे. डान्स सिक्वेन्समध्ये संजय सरांच्या अपेक्षेपर्यंत पोहोचणे किंवा त्यांच्या अपेक्षेच्या एक टक्क्यापर्यंत पोहोचणेदेखील आमच्यासाठी मोलाचे आहे.

नंतर मुलाखतीत जेव्हा शर्मिनने उघड केलं की ती उत्तम स्वयंपाक करते, तेव्हा रिचा हसली आणि म्हणाली, “काय?” यावर शर्मिन पुढे म्हणाली की, मी खरंच खूप चांगला स्वयंपाक करते. मी क्रिसमसदिवशी चांगलं चुंगलं खायला करते. तेव्हा रिचा म्हणाली, “मला वाटत नाही की तू आणि मी एकमेकांच्या शेजारी बसायला पाहिजे.”

हेही वाचा… ठरलं! सलमान खानच्या ‘सिकंदर’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची लागली वर्णी, चाहत्यांना गुड न्यूज देत म्हणाली…

ताहा शाह यानेही त्याच्या भूमिकेबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, सुरुवातीला त्याला तीन दिवसांची भूमिका करायची होती, परंतु नंतर ती बदलून त्याला बलराजची भूमिका दिली. त्या भूमिकेसाठी ३० दिवसांचं शूटिंग होतं. मात्र, नंतर संजय लीला भन्साळी यांनी त्याच्यात काहीतरी पाहिलं आणि त्याला ताजदारची भूमिका ऑफर केली.

दरम्यान, ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहोरमधील हीरा मंडीच्या रेड-लाइट जिल्ह्यातील तवायफांच्या (वेश्यांच्या) जीवनावर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल मेहता, फरदीन खान आदी कलाकार आहेत. या वेब सीरिजचा पहिला सीझन १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharmin segal cried for 4 days during heeramandi shoot dvr