‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे अभिनेता शशांक केतकर घराघरांत लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने साकारलेली श्रीरंग गोडबोले ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर शशांक चित्रपटांकडे वळला. आजवर त्याने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शशांकने काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्कॅम २००३’ या तेलगी घोटाळ्यावर आधारित सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये शशांकने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. अशातच आता अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा : स्टार प्रवाहने जाहीर केली ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेची वेळ; तब्बल ४ वर्षांनी ‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

शशांक लवकरच धर्मा प्रोडक्शन अर्थात करण जोहरची निर्मिती असलेल्या आगामी सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजचं नाव ‘शो टाइम’ असून, ही बहुचर्चित सीरिज येत्या ८ मार्चला प्रदर्शित केली जाणार आहे. याविषयी अभिनेता लिहितो, “८ मार्चपासून हॉटस्टारवर ‘शो टाइम’ पाहायला विसरू नका. जेव्हा मी धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेलो तेव्हाच जाणवलं ‘कुछ कुछ होता है’ माझी भूमिका लहानशी आहे पण, प्रेक्षकांसाठी ही भूमिका नक्कीच लक्षवेधी ठरेल.”

हेही वाचा : “त्याची हालचाल थांबली अन्…”, श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यावर काय घडलं? पत्नीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

दरम्यान, ‘शो टाइम’ सीरिजमध्ये मौनी रॉय, श्रिया सरन, इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल यांसारखे दिग्गज कलाकार एकत्र झळकणार आहेत. अशा लोकप्रिय कलाकारांबरोबर मराठी अभिनेता स्क्रीन शेअर करणार असल्याने सध्या शशांकवर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashank ketkar will play important role in karan johar dharma production show time series sva 00