Movies to Watch on OTT: १५ ऑगस्टमुळे या आठवड्याचा वीकेंड मोठा असणार आहे. अनेकांनी कुठेतरी बाहेर जायचे प्लॅन्स केले असतील पण काहींना मात्र घरी राहून आराम करायचा आहे. वीकेंड मोठा असल्याने तुम्ही घरबसल्या काही उत्तम चित्रपट व सीरिज पाहू शकता. आम्ही या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट, सीरिज व डॉक्युमेंट्रीची यादी आणली आहे. या सर्व कलाकृती १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान रिलीज होणार आहेत.
ऑगस्टचा तिसरा आठवडा खूप धमाकेदार होणार आहे, कारण ‘बिग बॉस ओटीटी ३’ मुळे चर्चेत असलेला अभिनेता रणवीर शौरीची वेब सीरिज देखील या वीकेंडला प्रदर्शित होणार आहे. या आठवड्यातील मोठ्या वीकेंडमध्ये तुम्ही कोणत्या कलाकृती बघू शकता, त्याची यादी पाहा.
शेखर होम
सस्पेन्स असलेले चित्रपट व वेब सीरिज पाहायला ज्या लोकांना आवडतं, त्यांच्यासाठी ही सीरिज चांगला पर्याय ठरू शकते. ही वेब सीरिज आज म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये केके मेनन व रणवीर शौरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
लव्ह नेक्स्ट डोअर
ही एक प्रेमकथेवर आधारित कोरियन वेब सीरिज आहे. ज्या लोकांना के-ड्रामा पाहायला आवडतात, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दोन लोकांची ही कथा आहे. ही वेब सीरिज १७ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या
वर्स्ट एक्स लव्हर
ही डॉक्युमेंटरी आहे, ज्यात प्रेमाची काळी बाजू दाखवण्यात आली आहे. यात ब्रेकअपच्या वेदना व प्रेम अपूर्ण राहिल्यानंतर होणारा त्रास विसरण्यासाठी एखादी व्यक्ती काय करू शकते हे पाहायला मिळतं. ही डॉक्युमेंटरी आज १४ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
जॅकपॉट
या चित्रपटाची कथा जुगाराभोवती फिरते. यात जिंकण्यासाठी मृत्यूचा खेळ होतो. दिवस उजाडण्यापूर्वी लॉटरीसाठी खून होतो. ही एक विचित्र पण खूपच मनोरंजक गोष्ट आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री कामावर जाण्याआधी जुळ्या मुलांबरोबर घालवतेय वेळ, फोटो शेअर करत म्हणाली…
द युनियन
हा चित्रपट एका विचित्र प्रेमकथेवर आधारित आहे, ज्याची कथा एका बांधकाम कामगाराभोवती फिरते. त्याच्या आयुष्यात त्याची एक्स गर्लफ्रेंड आल्यावर ज्या घटना घडतात, त्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट १६ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd