Stree 2 OTT Release Update: श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) व राजकुमार राव (Rajkummar Rao) यांच्या ‘स्त्री २’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळत आहे. चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि मागच्या १३ दिवसांपासून सतत दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडले आहेत. चित्रपटाने जगभरात ६०० कोटी रुपये कमावले आहेत, तर भारतातही चित्रपटाने ४०० कोटींहून जास्त कलेक्शन केलं आहे. या विनोदी भयपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘स्त्री २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. अजूनही लोक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत. अशातच हा चित्रपट कोणत्या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर येणार, याकडेही काही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तुम्ही कोणत्याही कारणाने हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकत नसाल व तो ओटीटीवर यावा याची वाट पाहत असाल तर तुम्हाला तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल, याबाबत जाणून घ्या.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

फक्त आठ कोटी बजेट असलेल्या ‘या’ बॉलीवूड सिनेमाने कमावले १०४ कोटी; पटकावले तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अमिताभ बच्चन…

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार ‘स्त्री २’

ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओने (Stree 2 on Prime Video) ‘स्त्री २’ चे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण वृत्तांनुसार, सामान्यपणे कोणताही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित केला जातो. त्यानुसार ‘स्त्री २’ दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सिनेमागृहात चित्रपट पाहताना ओटीटी पार्टनरमध्ये प्राइम व्हिडिओचे नाव दिसते, त्यामुळे चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार हे निश्चित झाले आहे, पण प्रदर्शनाची तारीख जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.

Video: धनंजय पोवारच्या पत्नी व आईने ‘बिग बॉस’वर आरोप करत व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या, “त्याला दाखवतंच नाहीये काय भानगड…”

‘स्त्री’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे?

या चित्रपटात सस्पेन्स व हॉरर आणि कॉमेडीचा थरार पाहायला मिळतो. या चित्रपटाचा पहिला भाग ‘स्त्री’ देखील हिट झाला होता. २०१८ मध्ये आलेल्या या चित्रपटाने दमदार कमाई केली होती. ‘स्त्री’ चित्रपट डिस्ने+ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

Stree 2 box office collection
‘स्त्री २’ चित्रपटाचे पोस्टर (फोटो – श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)

अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ हा दिनेश विजानच्या सुपरनॅचरल युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. ‘रुही’, ‘भेडिया’ आणि ‘मुंज्या’ या चित्रपटांनंतर ‘स्त्री २’ बॉक्स ऑफिस गाजवत आहे. यापूर्वीचा ‘मुंज्या’देखील सुपरहिट ठरला. चाहते आता ‘स्त्री २’ ओटीटीवर येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Video: “मला अजिबात पटलेलं नाही”, अंकिताने धनंजयला नॉमिनेट केल्यामुळे भडकली सोनाली पाटील, म्हणाली, “तुला जान्हवीबद्दल…”

‘स्त्री २’ मधील कलाकार

Stree 2 Star cast: या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर चित्रपटात अक्षय कुमार, वरुण धवन, तमन्ना भाटिया आणि अमर कौशिक यांचे कॅमिओ आहेत.

Story img Loader