Stree 2 on OTT: श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’ ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट मागील ४० दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या चित्रपटाने सर्वात मोठ्या शाहरुख खानच्या ‘जवान’ सिनेमाचा विक्रम कमाईच्या बाबतीत मोडला आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने भारतात जवळपास ६०० कोटींचा व्यवसाय केला आहे.

लोक मोठ्या प्रमाणात अजुनही कुटुंबासह हा चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत. हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये सुरू आहे. पण असे अनेक लोक आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने थिएटरमध्ये जाऊ शकले नाहीत आणि ते हा चित्रपट पाहू शकले नाहीत, किंवा काहींना घरबसल्या हा चित्रपट पाहायचा आहे. तुम्हीही त्यापैकी एक असाल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण ‘स्त्री २’ आता ओटीटीवर आला आहे.

हेही वाचाKaun Banega Crorepati 16: २२ वर्षीय स्पर्धकाने ७ कोटींच्या ‘या’ प्रश्नावर सोडला खेळ; तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे ‘स्त्री २’

‘स्त्री २’ हा प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. पण तुम्हाला तो मोफत किंवा फक्त सबस्क्रिप्शनमध्ये पाहता येणार नाही. तुम्हाला हा चित्रपट पाहायला पैसे मोजावे लागतील. आता तुम्हाला हा चित्रपट ओटीटीवर पाहायचा असेल तर तुम्हाला ३४९ रुपये खर्च करावे लागतील. तुमच्याकडे प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असेल तरीही तो पाहता येणार नाही. कदाचित पुढच्या महिन्यात तुम्हाला हा चित्रपट सबस्क्रिप्शनवर पाहता येईल.

“मी बाहेर येऊन बघितलं की त्यांनी…”, अरबाज पटेलने रितेश देशमुखबाबत केलेले वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “खूप गोष्टी…”

‘स्त्री २’ हा श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या २०१८ मध्ये आलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. हा चित्रपट १२० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता आणि या चित्रपटाने जगभरात एकूण ८५१ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. वरुण धवननेही या चित्रपटात कॅमिओ केला आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया आणि अक्षय कुमारही स्पेशल अपिअरन्समध्ये दिसत आहेत. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात अक्षय कुमार मुख्य खलनायक असू शकतो, अशी चर्चा आहे. मात्र निर्मात्यांनी अशी कोणतीही घोषणा अद्याप केलेली नाही.