वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीचा प्रियकराने दिल्लीत खून केल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. आफताब अमीन पूनावाला या २८ वर्षीय तरुणाने श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. फ्रिजमध्ये हे शरीराचे तुकडे ठेवून दिल्लीतील वेगवेगळ्या भागात ते फेकून त्याची विल्हेवाट लावण्याचा कट त्याने रचला होता. हत्याकांड झाल्यानंतर सहा महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आफताब व श्रद्धामधील प्रेमसंबंध त्यांच्या कुटुंबियांना मान्य नसल्यामुळे ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते. मार्च महिन्यात कामाच्या निमित्ताने ते दिल्लीला राहायला गेले होते. लग्न करण्यासाठी श्रद्धाने तगादा लावल्याने आफताबने तिचा खून केल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. चौकशीत आफताबने अनेक खुलासे केले असून ‘डेक्सटर’ ही वेब सीरिज बघून खूनाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती त्याने दिली आहे. अमेरिकन वेब सीरिजमुळे दिल्लीतील हत्याकांडांचा कट रचला गेला त्या ‘डेक्सटर’ या वेब सीरिजबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज

काय आहे डेक्स्टरची कथा?

‘डेक्सटर’ ही एक अमेरिकन क्राइम टीव्ही सीरिज आहे. लहानपणीच आपल्या आईची निर्घृण हत्या डोळ्यांनी पाहणाऱ्या डेक्सटर नामक पात्राची ही कथा आहे. तिसऱ्या वर्षी अनाथ झालेल्या या डेक्सटरला हॅरी मॉर्गन नावाचा पोलिस अधिकारी दत्तक घेतो. डेक्सटरच्या मनावर आईच्या हत्येचा खूप घातक परिणाम झालेला असतो. याचाच फायदा हॅरी घेतो. हॅरी कायद्याच्या कचाट्यातून सुटलेल्या आरोपींची हत्या डेक्सटरकडून करवून घेतो. त्यानंतर आपल्यावर कुणालाही संशय येणार नाही या हेतूने डेक्स्टर मियामीतील एका पोलिस स्थानकात फॉरेन्सिक स्पेशालिस्टची नोकरी करू लागतो.

डेक्सटर आरोपींची हत्या करताना कोणताही पुरावा सापडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत असतो. ज्या ठिकाणी आरोपींची हत्या करणार आहे, त्या संपूर्ण खोलीमध्ये प्लास्टिक लावून अत्यंत हुशारीने डेक्सटर त्याचा खून करतो. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन अटलांटिक महासागरात फेकून त्याची विल्हेवाट लावतो.

हेही वाचा >> Video : लेकीला राणीबागेत घेऊन गेला आदिनाथ कोठारे, पाणगेंड्याला पाहताच जिजा म्हणाली…

‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहता येईल डेक्स्टर वेब सीरिज

‘डेक्सटर’ सीरिजचा पहिला सीझन २००६मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या क्राइम सीरिजचे आठ भाग प्रदर्शित झाले आहेत. २०१३ साली डेक्सटर सीरिजचा आठवा आणि शेवटचा सीझन प्रदर्शित झाला. ‘अमेझॉन प्राइम’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज पाहता येईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha walkar murder case dexter web series inpsired aaftab poonawala to kill her gf kak