अभिनेत्री श्रिया पिळगावकरने वेब सीरिजच्या जगात आपली ओळख निर्माण केली आहे. ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माईंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’ व ‘ताजा खबर’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर आता श्रिया मोठ्या पडद्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. तिला ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा आहे, असं तिनं सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रिया पिळगावकर म्हणते, “आता मी चित्रपटांवर अधिक लक्ष केंद्रित करीत आहे. वेब सीरिजमुळे ओटीटीवर मला ओळख मिळाली आहे; परंतु चित्रपटांच्या माध्यमातून अजून काम करण्याची माझी इच्छा आहे. आतापर्यंत मी वास्तववादी भूमिका केल्या आहेत. मात्र, आता मला बॉलीवूडच्या मसालापटांचा अनुभव घ्यायचा आहे; जे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं.”

हेही वाचा…“मानवत मर्डर्सची कथा माझ्या गावाजवळच घडली”; बालपणीच्या भीतीदायक आठवणी सांगत मकरंद अनासपुरे म्हणाले, “आमच्या दैनंदिन जीवनावर… “

ऐतिहासिक चित्रपट आणि ‘या’ दिग्दर्शकासह काम करण्याची श्रियाची इच्छा

श्रिया ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाली की, तिला एक मोठा ऐतिहासिक चित्रपट करायचा आहे, ज्यात सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणावर असतील. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव घेण्याची तिची इच्छा आहे.

श्रिया सध्या ‘ताजा खबर’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे, जिथे तिने पुन्हा एकदा ‘मधू’ नावाच्या सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे. या भूमिकेबद्दल ती म्हणाली, ‘मधू’ ही एक आत्मसन्मान जपणारी आणि धैर्यवान स्त्री आहे. या शोने मला कॉमेडी करण्याची संधी दिली, असं श्रिया म्हणाली.

हेही वाचा…‘कलम ३७०’ते काश्मीरमधील विविध घटनांवर आधारित आहेत बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे, ओटीटीवर आहेत उपलब्ध; जाणून घ्या…

श्रिया म्हणाली, “मी नेहमीच कॅमेरा आणि मंचावर आत्मविश्वासानं वावरले; परंतु जेव्हा मी कथ्थक नृत्य शिकायला सुरुवात केली तेव्हा मला खऱ्या अर्थानं परफॉर्मिंग आर्ट्सशी जवळीक साधता आली.”

हेही वाचा…प्रकाश राज यांच्यामुळे झालं एक कोटींचं नुकसान, दाक्षिणात्य सिनेमाच्या निर्मात्याचे आरोप; म्हणाले, “तुम्ही कोणालाही न सांगता…”

श्रिया पिळगावकरच्या मते, फिल्म इंडस्ट्रीत टिकून राहणं सोपं नाही. “तुम्हाला स्वतःचा मार्ग निर्माण करावा लागतो. शेवटी, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून स्वतःचा वेगळा मार्ग शोधणं हेच खूप महत्त्वाचं आहे,” असं ती म्हणते. “माझ्यासाठी हा खूप रोमांचक काळ आहे. आता मी माझ्या सोईच्या क्षेत्राबाहेर जाऊन काहीतरी नवीन करण्यासाठी सज्ज आहे. स्वतःचा विकास करायचा असेल तर जोखीम घ्यावी लागते. कोणत्याही गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत,” अशी स्पष्टोक्ती तिनं मांडली.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shriya pilgaonkar aspires to work with sanjay leela bhansali psg