OTT releases This Weekend: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आहे. या महिन्यात अनेक चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाले. तसेच अनेक सिनेमे व वेब सीरिज ओटीटीवर रिलीज करण्यात आले. आधीच्या तीन आठवड्यांप्रमाणेच या शेवटच्या आठवड्यातही चांगल्या कलाकृती रिलीज झाल्या आहेत, तसेच काही लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत.
या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर काय बघायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही काही चित्रपट आणि सीरिज पाहू शकता. नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कलाकृती बघता येईल. याच कलाकृतींची यादी पाहा.
उर्मिला मातोंडकरपासून विभक्त होण्याच्या वृत्तानंतर मोहसीनची पहिली पोस्ट, ‘तो’ व्हिडीओ केला शेअर
ताजा खबर २
Taaza Khabar Season 2 on OTT: भुवन बामची मुख्य भूमिका असलेल्या ‘ताजा खबर’ या वेब सीरीजचा पहिला सीझन खूप गाजला होता आणि आता या शोचा दुसरा सीझन रिलीज होणार आहे. तुम्ही २७ सप्टेंबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा शो पाहू शकता. या शोमध्ये भुवन बामसह, श्रिया पिळगांवकर, प्रथमेश परब हे मराठी कलाकार आहेत.
लव्ह सितारा
Love Sitara on OTT: नागार्जुनची भावी सून आणि नागा चैतन्यची होणारी पत्नी, अभिनेत्री शोभिता धुलिपालाचा ‘लव्ह सितारा’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तुम्ही २७ सप्टेंबरपासून झी 5 वर हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटाची कथा इंटिरियर डिझायनर तारा आणि शेफ अर्जुन यांच्यावर आधारित आहे.
द ग्रेट इंडिया कपिल शो सीझन २
नेटफ्लिक्सवर द ग्रेट इंडिया कपिल शोचा दुसरा सीझन सुरू झाला आहे. या शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट ‘जिगरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. दुसरा एपिसोड २८ सप्टेंबरला येणार आहे. ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर, सैफ अली खान दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. हे स्टार्स त्यांच्या देवरा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत आहेत. देवरा: पार्ट १ २७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
वाझा: बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज
‘वाझा: बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज’ हा मल्याळम चित्रपट २३ सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात चार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे, जे स्वतःच्या शोधात एकत्र निघतात.
हेही वाचा – Urmila Matondkar Divorce: कोण आहे मोहसीन अख्तर मीर, काय करतो? जाणून घ्या
एलेन डी जेनेरेस: फॉर योर अप्रूव्हल
नेटफ्लिक्सवर २४ सितंबर को एलेन डी जेनेरेस: फॉर योर अप्रूव्हल हा शो रिलीज झाला आहे. यात द एलेन शोची लोकप्रिय होस्ट एलेन डी जेनेरेस टॉक्सिक वर्क कल्चरवर विनोद करताना दिसेल.