मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून काम करून स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर. यावर्षी ती ‘गिल्टी माइंड्स’ आणि ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सिरीजमध्ये झळकली. तिच्या या दोन्ही वेब सिरीज तुफान हिट झाल्या. त्यानंतर आता ती ‘ताजा खबर’ या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सिरीजमध्ये ती एका देहविक्री करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारण्याचा तिचा अनुभव कसा होता हे तिने नुकतंच सांगितलं.

‘ताजा खबर’ या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये श्रियाचीही झलक दिसली. देहविक्री करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत तिला बघताच तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तिचा हा अंदाजही सर्वांना आवडला असून प्रेक्षक त्याबद्दल तिचं कौतुक करत आहेत.

prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

आणखी वाचा : पहिला बॉलिवूड चित्रपट अपयशी झाल्याचा रश्मिका मंदानाला फटका, अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबाबत निर्मात्यांचा मोठा निर्णय

याबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्रिया म्हणाली, “‘ताजा खबर’ या वेब सिरीजचा भाग बनून मी खूप खुश आहे. यापूर्वी मी अशी कोणतीही भूमिका साकारली नव्हती. पण या सिरीजच्या निमित्ताने मला माझ्या अभिनय कौशल्याची ही बाजूही आजमावता आली. त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव खूपच नवीन होता.”

हेही वाचा : OTT वरील लोकप्रिय नाव बनलं आहे ‘श्रिया पिळगावकर’

पुढे तिने सांगितलं, ” याआधी ‘गिल्टी माईंड्स’मध्ये वकील म्हणून आणि ‘द ब्रोकन न्यूज’मध्ये पत्रकार म्हणून प्रेक्षकांनी मला पाहिलं. आता ‘ताजा खबर’ या सिरीजमध्ये प्रेक्षकांना मी आणखीनच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मी स्वतः या सिरीजसाठी खूप उत्सुक आहे. कारण ही अत्यंत वेगळी भूमिका आहे.” ही सिरीज ६ जानेवारी रोजी ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होईल.

Story img Loader