Singham Again OTT Release: रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा चित्रपट ‘सिंघम अगेन’ने (Singham Again) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (१ नोव्हेंबरला) प्रदर्शित झालेला हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. समीक्षकांचे रिव्ह्यूज चांगले नसले तरी प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ कडून तगडी टक्कर मिळत असली तरी सिनेमा जबरदस्त कामगिरी करतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात अजय देवगन, करीना कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ व अर्जुन कपूर या कलाकारांची मांदियाळी आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यावर अवघ्या तीन दिवसातच त्याच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – …तर ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती, नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमाबद्दल बोलताना केलेलं वक्तव्य

‘सिंघम अगेन’ हा २०११ मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सिंघम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. पहिला भाग हिट झाल्यानंतर २०१४ साली ‘सिंघम रिटर्न्स’ आला होता. आता जवळपास १० वर्षांनी तिसरा भाग आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत १०० कोटींची कमाई केली आहे. मात्र चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळाले नाहीत. आता या सिनेमाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती समोर आली आहे. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार, ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने ‘सिंघम अगेन’चे ओटीटी स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजच्या तारखेबद्दल बोलायचे झाल्यास एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ४५ दिवसांनी ओटीटीवर रिलीज केले जातात. ‘सिंघम अगेन’ डिसेंबरच्या शेवटी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाने तीन दिवसांत १२१ कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा – ‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी

‘सिंघम अगेन’ ची कथा

‘सिंघम अगेन’मध्ये अर्जुन कपूरने लंका नावाची भूमिका केली आहे. तो बाजीराव सिंघमची (अजय देवगण) पत्नी अवनी म्हणजेच करीना कपूर खानचे अपहरण करतो. या चित्रपटाची कथा रामायणाबरोबर पॅरालल चालते. करीनाला वाचवण्यासाठी जाणाऱ्या अजय देवगणला दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ व अक्षय कुमारची मदत होते.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singham again ott release update ajay devgn film will be released on this ott hrc