अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या ‘दहाड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘दहाड’मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा महिला पोलीस अधिकारी ‘अंजली भाटी’ ही भूमिका साकारणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून सोनाक्षी ओटीटीवर पदार्पण करणार आहे. १२ मे रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून एकूण आठ भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ला विरोध करणाऱ्यांवर अनुराग कश्यप संतापले म्हणाले, “काही आक्षेपार्ह असो वा नसो…”

‘दहाड’ वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये सध्या सोनाक्षी व्यस्त आहे. या दरम्यान तिने अनेक खुलासे केले आहेत, तिने सांगितले, “लहानपणी मी पोलीस ऑफिसर बनावे, अशी माझ्या वडिलांची (शत्रुघ्न सिन्हा) इच्छा होती. ते त्यांच्या सगळ्या मित्रांना सांगायचे माझी मुलगी पोलीस ऑफिसर होणार…त्यामुळे या वेब सीरिजमध्ये अंजली भाटी हे पात्र साकारताना मी तयार झाल्यावर सर्वात आधी माझ्या वडिलांना फोटो पाठवला आणि त्यांना सांगितले मी तुमचे स्वप्न पूर्ण केले आहे. ते ही सीरिज पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.” दहाडमध्ये बाइक चालवणे, जुडो, अ‍ॅक्शन स्टंटस करण्यासाठी सोनाक्षीने विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

हेही वाचा : श्रद्धा कपूरच्या ब्रिटिश ॲक्सेंटचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तू शक्ती कपूर यांची…”

सोनाक्षी पुढे म्हणाली, “मी खूप दिवसांपासून एका तगड्या आणि पॉवरफुल भूमिकेच्या शोधात होते, अशी भूमिका मिळण्यासाठी मी अनेक दिवस वाट पाहिली. आता मी प्रचंड आनंदी असून या वेब सीरिजमुळे माझे ओटीटीवर पदार्पण होणार असून पहिल्यांदाच प्रेक्षक मला एवढ्या मोठ्या फॉरमॅटमध्ये पाहणार आहेत.”

‘दहाड’ ही वेब सीरिज १२ मे २०२३ रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरियल किलर आणि पोलीस अधिकाऱ्यांभोवती या सीरिजचे कथानक फिरणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha father shatrughan sinha wanted her to be a cop dream came true with dahaad sva 00
Show comments