गेल्या काही वर्षांमध्ये मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स यांसारख्या जॉनरच्या चित्रपटांचे आणि वेब सिरिजचे प्रमाण खूप वाढत आहे. अशा कथानकांचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीसही पडत आहेत. या शैलीतील अनेक चित्रपट आणि वेब सीरिज हिट झाल्या आहेत. आता अशाच एका वेब सीरिजची गेले अनेक दिवस चर्चा आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘दहाड.’ आता या वेब सीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ॲमेझॉन प्राइम व्हिडीओच्या ‘दहाड’ वेब सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा महिला पोलीस अधिकारी अंजली भाटी ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून सोनाक्षी ओटीटीवर पदार्पण करीत आहे. ‘दबंग’ पोलीस अधिकाऱ्याच्या वेशातील सोनाक्षीची झलक ‘दहाड’ वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. आता या सीरिजचा ट्रेलर खूप चर्चेत आला आहे.

आणखी वाचा : “प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्याची ताकद आता स्टार्सकडे नाही…”, शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडले स्पष्ट मत

एका बेपत्ता मुलीचा शोध घेता घेता २७ महिलांच्या खून झाला असल्याची माहिती समोर येते. पण याबाबत एकही तक्रार नोंदविण्यात आलेली नसल्याचेही लक्षात येते. सार्वजनिक शौचालयात अनेक महिलांचे मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सोनाक्षी म्हणजेच अंजली भाटी हिच्याकडे देण्यात येतो. तेव्हा तिला समजते की, हे प्रकरण महिलांच्या आत्महत्येचे नसून याच्यामागे एक सीरियल किलर आहे. सीरियल किरल आणि पोलीस अधिकाऱ्याच्या अवतीभवती या सीरिजचे कथानक फिरणार आहे. तर यात अभिनेता विजय वर्माही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. यात त्याच्याकडे अंजली संशयित आरोपी म्हणून बघत असते. आता हे खून खरोखरच त्याने केलेत की यामागे वेगळ्याच व्यक्तीचा हात आहे हे ही सीरिज पाहिल्यावरच कळेल.

हेही वाचा : Video: “मुंबई पोलीस या लोकांना का पकडत नाहीत?”; सैफ-करीनाच्या बेजबाबदारपणावर नेटकरी संतापले

‘दहाड’ या वेब सीरिजचे एकूण आठ भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या घटना सीरियल किलरच्या शिकार झाल्याचे समजताच अंजली या प्रकरणाचा छडा कसा लावते, हे या सीरिजमधून दाखविण्यात येणार आहे. तर या सीरिजमध्ये गुलशन देवैया आणि सोहम शाह हेही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. ही वेब सीरिज १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Story img Loader