‘बिग बॉस १६’ फेम सौंदर्या शर्माचे एक ट्रक चालकाने अपहरण केले होते. तिने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. बिग बॉसमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी सौंदर्या तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. एका मुलाखतीत तिने लहानपणीची एक घटना सांगितली.
अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”
तिच्या बालपणातील तिच्या अपहरणाच्या घटनेबद्दल बोलताना सौंदर्या म्हणाली, “मी शाळेत असताना एका ट्रक चालकाने माझे अपहरण केले होते. तो ट्रक ड्रायव्हर रोज मला बघायचा. एके दिवशी आईस्क्रीम घेऊन देण्याच्या बहाण्याने त्याने माझे अपहरण केले आणि त्यानंतर माझ्या बहिणीने माझ्या अपहरणाची माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर माझ्या वडिलांनी मला वाचवलं होतं.” तिच्या अपहरणाच्या अनुभवाबद्दल सौंदर्या म्हणाली की आपल्या पालकांनी थोडं कठोर असणं आवश्यक आहे, कारण मुलांना विचलित करणाऱ्या खूप गोष्टी असतात. त्यामुळे पालक जर कठोर असतील तर मुलं विचलित होणार नाही.
शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”
याशिवाय सौंदर्याने तिच्या कॉलेजमध्ये तिच्या शिक्षकाकडून होणाऱ्या त्रासाविषयी सांगितलं. सौंदर्या म्हणाली, “माझ्या कॉलेजचा एचओडी माझ्यावर लाइन मारत होता. तो असं का करत होता हे मला समजत नव्हते. त्याच्यामुळे मी काही दिवस कॉलेजला गेले नव्हते. पण माझ्या वडिलांना हे कळल्यावर त्यांना खूप राग आला व त्यांनी त्या एचओडीला धडा शिकवला होता.”
सौंदर्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘रक्तांचल २’, ‘कंट्री माफिया’ आणि ‘कर्मयुद्ध’मध्ये या सीरिजमध्ये काम केलंय. तिला बिग बॉस १६ मधूनच ओळख मिळाली. तिने अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केलं आहे.