बॉलीवूडमध्ये सध्या एकामागोमाग एक हॉरर चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि प्रेक्षकांमध्ये या जॉनरबद्दल एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत अनेक थरारक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’मधून प्रेक्षकांना एक भन्नाट हॉरर-कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. मात्र, त्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे.

जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे चाहते असाल आणि काही खास चित्रपटांचा आनंद घ्यायचा असेल, तर काळजीचं कारण नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही खास साउथच्या हॉरर चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही ओटीटीवर मोफत पाहू शकता.

हेही वाचा…New Ott Release : रोमँटिक-थ्रिलर, आणि अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचरची मेजवानी, या वीकेंडला बघा ओटीटीवरील ‘या’ नव्या कलाकृती

अरुंधती (Arundhati)

२००९ साली प्रदर्शित झालेला अनुष्का शेट्टी आणि सोनू सूद अभिनीत ‘अरुंधती’ हा चित्रपट एक भयानक रहस्य उलगडतो. या सिनेमात एका प्राचीन गूढ बाबीचा मागोवा घेतला जातो, जिथे सैतानी शक्तींची एका बॉक्समधून सुटका होते. कोडी रामकृष्ण यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनुष्काच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना एक थरारक अनुभव मिळतो. हा चित्रपट यूट्यूबवर मोफत उपलब्ध असल्याने या सिनेमाचा घरबसल्या आनंद घेता येऊ शकतो.

चंद्रमुखी (Chandramukhi)

२००५ साली प्रदर्शित झालेला ‘चंद्रमुखी’ हा थलाइवा रजनीकांत, ज्योतिका व प्रभू अभिनीत चित्रपट पी. वासू यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची भयानक कथा आणि रजनीकांतचा प्रभावी अभिनय प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करतो. अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या ‘भूल भुलैया’ चित्रपटाचे हे मूळ व्हर्जन आहे. या वर्षी दिवाळीत ‘भूल भुलैया’ या हिंदी चित्रपटाचा तिसरा भागदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्ही ‘चंद्रमुखी’ हा चित्रपटदेखील यूट्यूबवर मोफत पाहू शकता.

.हेही वाचा…या वीकेंडला OTT वर अनुभवा थरार, पाहा नेटफ्लिक्सवरील ‘या’ पाच थ्रिलर वेब सीरिज

अवल (Aval)

‘अवल’ हा तमीळ चित्रपट असून, त्याचे हिंदी रूपांतर ‘द हाऊस नेक्स्ट डोअर’ या नावाने करण्यात आले आहे. २०१७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट मिलिंद राऊ यांनी दिग्दर्शित केला आहे. सिद्धार्थ आणि अँड्रिया जेरेमियाह यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या असून, या चित्रपटात नवविवाहित जोडप्याच्या सुखी जीवनात झालेले बदल पाहायला मिळतात. अचानक घडलेल्या एका घटनेमुळे त्यांच्या जीवनात भीतीचे वातावरण पसरते, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

भागमती (Bhaagamathie)

२०१८ साली प्रदर्शित झालेला ‘भागमती’ हा हॉरर आणि अ‍ॅक्शन यांचा उत्तम संगम असलेला चित्रपट आहे. अनुष्का शेट्टी आणि जयराम यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपटदेखील यूट्यूबवर उपलब्ध आहे.

हेही वाचा…या आठवड्यात OTT वर बघा हटके कथांसह जबरदस्त अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि थ्रिलर कंटेन्ट, वाचा यादी

वरील चित्रपटांची यादी पाहून, निवांत क्षणी यापैकी कोणता चित्रपट पाहायचा ते ठरवा आणि भय व थरार यांच्या नव्या पातळीवरील अनुभवासाठी सज्ज व्हा.

Story img Loader