Famous Spy Series On Ott : ओटीटी माध्यमावर येणाऱ्या सिटाडेल हनीबनी या स्पाय-अॅक्शन वेब सीरिजची चर्चा आहे. ही वेब सीरिज ७ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभु यांच्या प्रमुख भूमिकेत असलेली स्पाय-अॅक्शन वेब सीरिज ‘सिटाडेल हनी बनी’ सध्या चर्चेत आहे. ‘सिटाडेल हनी बनी’ प्रेक्षकांना गुप्तहेरांच्या रोमांचक जगात घेऊन जाणारी कथा आहे. प्रेक्षकांमध्ये स्पाय सीरिज आणि चित्रपटाचे नेहमीच आकर्षण असते. ओटीटीवर बऱ्याच स्पाय-अॅक्शन कंटेंट उपलब्ध असून या सीरिजमुळे एक रोमांचक अनुभव घेता येईल. आम्ही तुम्हाला गाजलेल्या स्पाय अ‍ॅक्शन वेब सीरिजची माहिती देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

द ब्यूरो

The Bureau on ott ‘द ब्यूरो’ ही एक फ्रेंच स्पाय-थ्रिलर सीरिज आहे. एरिक रोचांट यांनी या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं असून त्यांनी स्वतः या सीरिजची कथा लिहिली आहे. ही सीरिज DGSE या फ्रेंच गुप्तचर संस्थेच्या एजंट्सच्या जीवनावर आधारित आहे. २७ एप्रिल २०१५ रोजी प्रदर्शित झालेल्या या सीरिजला जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळाली. आएमडीबीवर ‘द ब्यूरो’ ला ८.७ रेटिंग मिळाले असून, प्राईम व्हिडीओवर ती उपलब्ध आहे.

हेही वाचा…थिएटरमध्ये रिलीज झाले, पण ओटीटीवर रखडलं प्रदर्शन; अखेर घरबसल्या पाहता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट

द सॅन्डबॅगर्स

The Sandbaggers on ott : ‘द सॅन्डबॅगर्स’ ही ब्रिटीश स्पाय थ्रिलर सीरिज आहे, जी इयान मॅकिन्टोश यांनी तयार केली आहे. ही सीरिज कोल्ड वॉरदरम्यानच्या गुप्तचरांच्या कथा मांडते. १९७८ ते १९८० दरम्यान ब्रिटीश आणि अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संबंधांवर ही सीरिज प्रकाश टाकते. या सीरिजला आएमडीबीवर ८.७ रेटिंग मिळाली आहे, ही वेब सीरिज अ‍ॅपल टीव्ही व प्राईम व्हिडीओवर पाहता येऊ शकते.

पर्सन ऑफ इंटरेस्ट

Person of Interest on ott : जोनाथन नोलन यांनी दिग्दर्शित केलेली ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ ही सीरिज सीआयएचे माजी एजंट जॉन रीजवर आधारित आहे. जॉन एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मदतीने न्यूयॉर्क शहरातील गुन्ह्यांना AI द्वारे थांबवण्याचा प्रयत्न करतो. आएमडीबीवर या सीरिजला ८.५ रेटिंग आहे आणि प्राईम व्हिडीओवर ती उपलब्ध आहे.

हेही वाचा…‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

२४

24 series on ott : ‘२४’ ही जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेली स्पाय-अॅक्शन टीव्ही सीरिज आहे. ही कथा एजंट जॅक बाउरच्या जीवनाभोवती फिरते. तो आपल्या देशाला आंतकवादी हल्ल्यांपासून वाचवण्याचा निर्धार करतो. यानंतर पुढे काय काय घडतं हे सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. या सीरिजला गोल्डन ग्लोब आणि प्राइम टाइम एमी असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आएमडीबीवर या सीरिजला ८.४ रेटिंग मिळाली आहे आणि ही सीरिज डिस्नी + हॉटस्टारवर पाहता येईल.

द अमेरिकन्स

the americans on ott : जो वीसबर्ग यांनी दिग्दर्शित केलेली ‘द अमेरिकन्स’ ही सीरिज २०१३ मध्ये प्रदर्शित झाली होती. कोल्ड वॉर काळातील ही कथा अमेरिकेतील दोन रशियन गुप्तचर एजंट्स, एलिझाबेथ आणि फिलिपच्या जीवनावर आधारित आहे. IMDb वर या सीरिजला ८.४ रेटिंग मिळाली आहे आणि ती प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

हेही वाचा…OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी

होमलँड

Homeland on ott : होमलँड ही अमेरिकन स्पाय थ्रिलर वेब सीरिज हावर्ड गॉर्डन आणि अलेक्स गांसा यांनी तयार केली आहे. ही इस्त्रायली सीरिज ‘प्रिजनर्स ऑफ वॉर’वर आधारित आहे. आएमडीबीवर सीरिजला ८.३ रेटिंग मिळाली असून, ही सीरिज डिस्नी + हॉटस्टारवर पाहता येईल.

डेंजर मॅन

Danger Man on ott : डेंजर मॅन ही ब्रिटीश टीव्ही सीरिज आहे, ज्यात पॅट्रिक मॅकगोहान यांनी गुप्त एजंट जॉन ड्रेकची भूमिका साकारली आहे. आएमडीबीवर या सीरिजला ७.९ रेटिंग आहे, ही सीरिज प्राईम व्हिडीओ तसेच यूट्यूबवर पाहता येऊ शकते.

हेही वाचा…हॉरर चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ भयपट पाहताना फुटेल घाम, भयंकर आहेत कथा

स्पूक्स (MI-5)

Spooks on ott ब्रिटीश टीव्ही सीरिज ‘स्पूक्स’ काही देशांमध्ये MI-5 या नावाने ओळखली जाते. ही सीरिज १३ मे २००२ ते २३ ऑक्टोबर २०११ दरम्यान बीबीसी वनवर प्रसारित झाली होती. MI-5 मधील सेक्शन डीच्या गुप्त एजंट्सच्या जीवनावर आधारित ही कथा आहे. आएमडीबीवर या सीरिजला ८.३ रेटिंग मिळाली आहे, ही सीरिज प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे.