Squid Game Season 2: सध्या कोरियन वेब सीरिज जगभरात मोठ्या प्रमाणात पाहिल्या जात आहेत. भारतात देखील याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आता कोरियन सीरिजचे चाहते असलेल्यांसाठी एक आनंदी बातमी समोर आली आहे. लवकरच लोकप्रिय कोरियन वेब सीरिज ‘स्क्विड गेम’चा दुसरा सीझन भेटीस येत आहे. ‘स्क्विड गेम’चा दुसरा सीझन कुठे, कधी प्रदर्शित होणार जाणून घ्या?

तीन वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘स्क्विड गेम’ सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. तसंच या थ्रीलर वेब सीरिजने जगभरात धुमाकूळ घातला होता. पहिल्या सीझनमध्ये ९ भाग होते. आता पहिल्या सीझनला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. १ ऑगस्टला ‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. तसंच शेवटचा सीझन देखील कधी प्रदर्शित होणार, हे देखील समोर आलं होतं.

हेही वाचा – KBC 16 : अमिताभ बच्चन ATM मध्ये कधीच गेले नाहीत, जया बच्चन यांच्याकडून घेतात पैसे, म्हणाले…

‘स्क्विड गेम’चा दुसरा सीझन उद्या, २६ डिसेंबरला प्रदर्शित होतं आहे. त्यामुळे आता तीन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. सीरिजचं नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग मध्यरात्री ३ वाजल्यापासून होणार आहे. ‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनचे सर्व सातही भाग एकत्र प्रदर्शित होणार आहेत. ही सीरिज प्रेक्षक नेटफ्लिक्सच्या महिन्याच्या किंवा वर्षाच्या सब्सक्रिप्शनवर पाहू शकतात. या सीझनमध्ये नवीन रंजक ड्रामा पाहायला मिळणार आहे.

Squid Game 2मध्ये काय पाहायला मिळणार?

‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनमध्ये ली जंग-जे पुन्हा एकदा सेओंग गि-हूनच्या भूमिकेत झळकणार आहे. खेळाडू क्रमांक ४५६चे यावेळी उद्दिष्ट हा धोकादायक खेळ कायमचा संपवणं हे आहे. यासाठी तो पुन्हा एकदा रेड आणि ग्रीन लाईट अशा अनेक नव्या आव्हानांना सामोरे जाणार आहे. याशिवाय तो फ्रंट मॅन (गोंग यू) विरुद्ध एक नवीन लढाई लढणार आहे, जो स्क्विड गेमचा मास्टरमाइंड असल्याचं म्हटलं जातं आहे. आता गि-हून हा खेळ संपवण्यात यशस्वी होतो? की त्यात अडकत राहतो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनमध्ये अनेक नवीन पात्र पाहायला मिळणार आहेत.

Squid Game 2
Squid Game 2

हेही वाचा – Bigg Boss 18: आठवड्याभराच रेशन गमावून चुम दरांग झाली ‘टाइम गॉड’, पण अवघ्या काही तासांत ‘बिग बॉस’ने पदावरून केली हकालपट्टी

हेही वाचा – केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

दरम्यान, ‘स्क्विड गेम’ वेब सीरिजचा पहिला सीझन आणण्यासाठी १२ वर्षे लागली होती. पण ही सीरिज नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका बनण्यासाठी फक्त १२ दिवस लागले होते. प्रदर्शित होताच अनेक देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ‘स्क्विड गेम’ सीरिज ट्रेंड करत होती. त्यामुळेच दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर २६ डिसेंबरपासून ‘स्क्विड गेम’चा दुसरा सीझन ( Squid Game 2 ) सर्वत्र पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे आता ‘स्क्विड गेम’च्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे या लोकप्रिय सीरिजचा तिसरा, अखेरचा सीझन २०२५मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader