सप्टेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्क्विड गेम’ ही दक्षिण कोरियन सीरिज खूप गाजली. या वेब सीरिजचे कथानक एका जिवघेण्या खेळाभोवती फिरते. जगभरातल्या प्रेक्षकांना या सीरिजचे वेड लागले आहे. चाहते ‘स्क्विड गेम २’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही महिन्यापूर्वी या सीरिजचा दुसरा सीझन येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. नेटफ्लिक्सच्या या सीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधल्यामुळे ते कोरियन सिनेमा-वेब सीरिजकडे वळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्क्विड गेम’ या लोकप्रिय सीरिजमध्ये अनुपम त्रिपाठी या भारतीय अभिनेत्याने ‘अली अब्दुल’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याने साकारलेले हे पात्र अजरामर झाले आहे. कामाच्या शोधात कोरियाला पोहोचलेला पाकिस्तानचा गरीब अली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या खेळात सहभाग घेतो. खेळ सुरु असताना तो ज्या स्पर्धकाला मित्र समजून त्याची मदत करतो, तोच स्पर्धक त्याला दगा देतो. यात भाबड्या अलीचा जीव जातो. या भूमिकेमुळे अनुपमच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. सर्वत्र त्याच्या कामाचे कौतुकही झाले.

आणखी वाचा – ‘ज्युरॅसिक वर्ल्ड डोमिनियन’ आता ओटीटीवर होणार प्रदर्शित, कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट? वाचा

अनुपम गेल्या काही वर्षांपासून दक्षिण कोरियामध्ये वास्तव्याला आहे. नुकतीच त्याची भेट दिग्दर्शक अनुराग कश्यपशी झाली. तो काही कामानिमित्त कोरियामध्ये आहे. या भेटीदरम्यानचा फोटो अनुपमने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. “माझ्या आयुष्यातला एक आनंददायी क्षण. आज मी भारतातील माझ्या आवडत्या दिग्दर्शकाला भेटलो. मला दिलेल्या छोट्या, पण अविस्मरणीय भेटीसाठी धन्यवाद”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. या भेटीमुळे ते दोघे एकत्र काम करणार असल्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. या विषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा – प्रणय, प्रेम अन् नातेसंबंधांचा ट्रिपल तडका; ‘फोर मोर शॉटस प्लीज’च्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित

अनुपम मुळचा नवी दिल्लीचा आहे. २००६ मध्ये त्याने अभिनय करायला सुरुवात केली. त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून अभिनयाची पदवी देखील मिळवली आहे. २००६ ते २०१० या चार वर्षांच्या कालावधीमध्ये त्याने अनेक नाटकांमध्ये काम करत अनुभव मिळवला. त्यानंतर त्याला कोरियन नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स येथून स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर तो दक्षिण कोरियामध्ये स्थायिक झाला.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Squid game star anupam tripathi posted photo with anurag kashyap yps