‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. त्यामुळेच आता सीझन-२ बाबत चर्चा सुरू झाली आहे. ‘बिग बॉस ओटीटी सीझन-२’ यंदा सलमान खान होस्ट करणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसमध्ये अभिनेत्री सनी लिओनी हजेरी लावणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. याबाबत आता स्वत: अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत खुलासा केला आहे.
‘बिग बॉस ओटीटी सीझन-२’ मध्ये यंदा बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हजेरी लावणार आहे. यापूर्वी सनीने बिग बॉसच्या २०११ च्या पाचव्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर कालांतराने तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आता सनी लिओनी पुन्हा एकदा बिग बॉस ओटीटीमध्ये येणार असल्याने तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
हेही वाचा : १८ वर्षांनी तमन्ना भाटियाने का मोडला ‘नो किसिंग पॉलिसी’चा नियम? अभिनेत्री खुलासा करीत म्हणाली…
सनी लिओनी याबाबत खुलासा करताना म्हणाली, “बिग बॉस ओटीटीवर येणे म्हणजे माझ्या दुसऱ्या घरी येण्यासारखे आहे. या शोबद्दल माझ्या मनात अनेक आठवणी आहेत. बिग बॉसमुळे माझ्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, मी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यामुळे मला पुन्हा एकदा शोमध्ये येण्याची संधी मिळत आहे हे खूपच छान आहे. परंतु, यंदा मी स्पर्धक म्हणून येणार नसून मी कशासाठी येणार आहे हे तुम्ही ओळखा…”
हेही वाचा : “विकी-कतरिनासह आलिया करतेय गॉसिप?” एअरपोर्टवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “रणबीरची तक्रार…”
स्पर्धक म्हणून येणार नाही असा खुलासा व्हिडीओ शेअर करीत सनी लिओनीने केल्यामुळे, बिग बॉस ओटीटीमध्ये तिची भूमिका काय असेल? याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सनी लिओनी सलमान खानबरोबर शो होस्ट करणार, ओपनिंग कार्यक्रमला येणार की, काही भागांमध्ये हजेरी लावून स्पर्धकांना टास्क देण्यासाठी येणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी सीझन-२’ प्रेक्षकांना जिओ सिनेमा आणि व्हूट सिलेक्टवर विनामूल्य पाहता येणार आहे.