अलीकडच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ५ सप्टेंबर रोजी थलपती विजयचा ‘GOAT’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, या चित्रपटाला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे. चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. पण फक्त हाच नाही तर अनेक दाक्षिणात्य चित्रपट भारतातील इतर भागात लोकप्रिय झाले. या प्रादेशिक चित्रपटांनी देशभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तुम्हालाही दाक्षिणात्य चित्रपट पाहायला आवडत असतील तर अल्लू अर्जुन, विजय सेतुपतीसह इतरही साऊथ स्टार्सचे चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहेत.

तुम्हाला घरबसल्या ओटीटीवर पाहता येतील अशा काही सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटांची नावं जाणून घ्या. या चित्रपटांनी फक्त चांगली कमाईच केली नव्हती, तर समीक्षकांकडूनही कौतुक झाले होते.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Thalapathy Vijay GOAT Box Office Collection
थलपती विजयच्या ‘GOAT’ने पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, ‘इतके’ कोटी कमावले
Bad News on OTT
१५ ऑगस्टला प्रदर्शित झालेला चित्रपट आला OTT वर, या वीकेंडला बॅड न्यूजसह ‘हे’ सिनेमे घरबसल्या पाहता येणार
IC 814 The Kandahar Hijack (1)
IC 814 The Kandahar Hijack सीरिजवरून नवा वाद, ANI ची Netflix विरोधात याचिका; नेमकं प्रकरण काय?
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
recent OTT release
या वीकेंडला OTT वर काय पाहायचं? वाचा चित्रपट अन् सीरिजची यादी!

महाराजा

१४ जून रोजी प्रदर्शित झालेला विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप यांचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. निथिलन स्वामीनाथन दिग्दर्शित या चित्रपटात पत्नीचे निधन झाल्यावर पुरुषाचे आयुष्य कसे बदलते हे दाखवण्यात आलं आहे. या घटनेत त्याची लहान मुलगी बचावते आणि मग घरातून लक्ष्मी चोरी होते. त्यामुळे विजय अस्वस्थ होतो. आता ही लक्ष्मी नेमकी कोण आहे ते तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल.

धाडस असेल तरच पाहा मन हेलावणारे OTT वरील ‘हे’ तीन चित्रपट, एकावर घालण्यात आली होती बंदी!

कांतारा

तुम्ही अजूनही ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट पाहिला नसेल, तर एकदा पाहू शकता. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला आणि या कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

कैथी

लोकेश कांगराज दिग्दर्शित ‘कैथी’ हा ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचा एक उत्तम नमुना असल्याचं म्हटलं जातं. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. हा चित्रपट सोनी लिव्हवर पाहता येईल.

जय भीम

सूर्याची मुख्य भूमिका असलेला ‘जय भीम’ हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाला लोकांचे खूप प्रेम मिळाले. तसेच आयएमडीबीवर रेटिंगही चांगले मिळाले. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

Call Me Bae to Sector 36: सप्टेंबर महिन्यात OTT वर येणार ‘हे’ चित्रपट अन् सीरिज; वाचा संपूर्ण यादी

सुपर डिलक्स

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हा विजय सेतुपतीची मुख्य भूमिका असलेला चित्रपट आहे. या थ्रिलर कॉमेडी चित्रपटात विजयसह समांथा व इतर अनेक स्टार्स होते. हा चित्रपट हॉटस्टारवर उपलब्ध आहे. या चित्रपटांशिवाय तुम्ही अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’, थलपथी विजयचा ‘बीस्ट’ असे बरेच दाक्षिणात्य चित्रपट ओटीटीवर पाहू शकता.