Munjya OTT Release: कोकणातील लोककथेवर आधारित ‘मुंज्या’ (Munjya Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. हा चित्रपट ७ जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या दिग्दर्शकाने केलं होतं, तसेच यात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत आहेत.

मोना सिंग, शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मुंज्या’ या भयपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. चांगली कामगिरी करत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लिजेंड ऑफ मुंज्याभोवती फिरतो. कोकणातील लोककथांवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ११८ कोटींची कमाई केली, तर जगभरात १२३.१ कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लटफॉर्मवर येणार याबद्दल दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने माहिती दिली.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Vineeta Singh says Ek crore to aap ek ghante mein kama lete ho (1)
Video: “तासाला १ कोटी कमावता, मग इथे…” ‘शार्क टँक’मध्ये आलेल्या प्रसिद्ध युट्यूबरला विनीता सिंहचा सवाल अन्…

राजीव भाटिया कसा झाला अक्षय कुमार? नाव बदलल्यावर वडिलांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला, “तेव्हा राजीव गांधी…”

‘मुंज्या’च्या ओटीटी रिलीजबद्दल दिग्दर्शक म्हणाले…

‘बॉलीवूड लाईफ’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्यने ‘मुंज्या’च्या ओटीटी रिलीजबद्दल तपशील शेअर केले. हा चित्रपट ऑगस्टनंतर ओटीटीवर प्रदर्शित होईल, अशी माहिती त्याने दिली. कोणताही चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाल्यावर तो ओटीटीवर लगेच प्रदर्शित करता येत नाही. किमान दोन महिन्यांनी तो ओटीटीवर रिलीज केला जातो. त्यामुळे ‘मुंज्या’चे डिजिटल प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल, असं त्याने सांगितलं. हा चित्रपट ७ जूनला प्रदर्शित झाला होता, त्यामुळे तो ऑगस्टच्या सुरुवातीला किंवा सप्टेंबरमध्ये तुम्हाला ओटीटीवर पाहता येईल. पण अद्याप या चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

munjya OTT release
मुंज्या चित्रपटाचे पोस्टर (फोटो – इन्स्टाग्राम)

५००० कोटींचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट, तरीही डोक्यावर कर्ज अन्…; अनिल अंबानींपेक्षा श्रीमंत आहेत पत्नी टीना मुनीम

चित्रपटाची कथा

‘मुंज्या’ चित्रपटाची कथा एका मुलाभोवती फिरते ज्याला मुन्नी नावाच्या त्याच्यापेक्षा मोठ्या मुलीशी लग्न करायचं आहे. जेव्हा त्याच्या आईला हे कळतं तेव्हा ती त्याचं मुंडन करते. नंतर मुलगा जादुटोणा करू लागतो, यातच त्याचा जीव जातो व नंतर तो ब्रह्मराक्षस बनतो. ‘मुंज्या’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. या हिंदी चित्रपटात सुहास जोशी, मोना सिंह, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहेत.

Story img Loader