दर आठवड्याला देशात अनेक चित्रपट चित्रपट होतात. यात बॉलीवूड चित्रपटांसह प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचाही समावेश आहे. सध्या प्रेक्षक फक्त बॉलीवूडमधील चित्रपटच नाहीत तर प्रादेशिक भाषेतील चित्रपट पाहणंही पसंत करतात. याचाच परिणाम म्हणजे भाषा अडसर न ठरता दाक्षिणात्य भाषेतील अनेक चित्रपट देशभरात सुपरहिट होतात. असाच एक चित्रपट दोन वर्षांपूर्वी आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटपेक्षा कैक पटीने जास्त कमाई केली होती. या चित्रपटाची इतकी क्रेझ आहे की यातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही सोशल मीडियावर अनेक मीम्स किंवा व्हिडीओ पाहिले असतील ज्यामध्ये दाढी असलेला अभिनेता श्वानाबरोबर दिसतो. लोक अनेकदा या चित्रपटाच्या छोट्या क्लिप शेअर करत असतात, ती क्लिप ‘777 चार्ली’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात एक माणूस आणि त्याच्या श्वानाची कथा दाखवण्यात आली आहे. त्यांच्यातील बॉन्डिंग प्रेक्षकांना भावुक करते. या चित्रपटाची कथाही जबरदस्त होती. ‘777 चार्ली’ने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती.

‘हॅलो छायाजी, मैं…’, जेव्हा कोकणात असलेल्या छाया कदमांना तब्बूने केला होता फोन

‘777 चार्ली’ ची कथा एक माणूस आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या श्वानाभोवती फिरते. जगण्याची इच्छा नसलेल्या मुख्य कलाकाराच्या आयुष्यात एक श्वान येतो आणि मग ते दोघे कसे एकमेकांचा आधार बनतात यावर बेतलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटात दोघांचे बाँडिंग पाहून तुम्ही भावुक व्हाल.

मावशी खासदार झाल्यावर जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची पोस्ट, प्रणिती शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

‘777 चार्ली’ ने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली होती?

दिग्दर्शक किरणराजच्या ‘777 चार्ली’ या चित्रपटात धर्मा नावाची एक व्यक्ती आयुष्यात खूप निराश हसते. त्यानंतर चार्ली नावाचा कुत्रा धर्माच्या आयुष्यात येतो आणि तो धर्माचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतो. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ च्या मते, चित्रपटाचे बजेट फक्त १५ कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०२.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. दोन वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटात रक्षित शेट्टीने धर्माची भूमिका साकारली आहे.

बॉलीवूड अभिनेत्रीने प्रचार करूनही हरले तिचे बाबा, पराभवानंतर पोस्ट करत म्हणाली, “ज्यांनी माझ्या वडिलांवर…”

‘777 चार्ली’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?

रक्षित शेट्टीशिवाय संगीता, राज बी शेट्टी, दानिश सेट, बॉबी सिम्हा, अभिजित महेश यांसारखे दाक्षिणात्य कलाकार ‘777 चार्ली’ चित्रपटात झळकले होते. पण संपूर्ण चित्रपटात फक्त रक्षित शेट्टी आणि त्या श्वानाची महत्त्वाची भूमिका होती. तुम्हाला हा ब्लॉकबस्टर चित्रपट अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superhit movie with no action romance 777 charlie rakshit shetty film budget hrc