Aarya 3 Trailer : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची ‘आर्या’ वेब सीरिज चांगलीच गाजली होती. या वेब सीरिजमधून सुश्मिताने कमबॅक केलं होतं. या वेबसीरिजचे आतापर्यंत २ सीझन प्रदर्शित झाले आहे. ज्यात सुश्मिताचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुश्मिता तिसऱ्या सीझनच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

३ दिवसांपूर्वी या सीझनचा टीझर प्रदर्शित झाला होता, आता नुकताच याचा ट्रेलरही लोकांसमोर आला आहे. या वेब सीरिजमध्ये सुश्मिताने आर्या नावाच्या माफिया क्वीनची भूमिका निभावली आहे. वडिल आणि नवऱ्याच्या जाण्यानंतर त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाची सूत्रं आर्याच्या हाती येतात, इच्छा नसतानाही तिला या गुन्हेगारी विश्वात उतरावं लागतं अन् इथून पुढे तिचा माफिया क्वीन बनण्यापर्यंतचा प्रवास आपण आधीच्या दोन सीझनमध्ये पाहिला आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

आणखी वाचा : Aarya 3 Teaser: “कहानी का अंत…” बहुचर्चित ‘आर्या ३’चा टीझर प्रदर्शित; माफिया क्वीन बनलेल्या सुश्मिताचा दमदार अंदाज

टीझर पाहून आर्याचा हा प्रवास संपुष्टात येणार का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आला होता, पण आता ट्रेलर पाहून हा तिसरा सीझन आणखी बरीच रहस्य उलगडणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. १००० कोटींच्या अंमली पदार्थांच्या डीलच्या अवतीभवती हे कथानक फिरताना दिसत आहे. तर या नव्या सीझनमध्ये आर्यासमोर एक नवीन स्पर्धकही उभा राहताना दिसणार आहे. याबरोबरच या नव्या सीझनमध्ये कायम आपल्या मुलांचं रक्षण करणाऱ्या आर्याच्या कुटुंबावरच संकट ओढावलं असल्याचंही ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे.

आता या संकटातून आर्या नेमकी बाहेर पडणार का अन् जरी पडली तरी तिच्या मुलांच्या जीवाचं बरं वाईट होणार का किंवा ती पोलिसांच्या तावडीत सापडणार का? अशा कित्येक प्रश्नांची उत्तारं सीरिज पाहिल्यावर मिळतील. या तिसऱ्या सीझनमध्ये ‘आर्या’च्या भूमिकेत सुश्मिता सेन नेहमीप्रमाणेच डॅशिंग दिसत आहे. याबरोबरच वयोमानाने तिच्यात झालेला बदलही ट्रेलरमध्ये अगदी स्पष्ट जाणवतो आहे.

आता आर्या तिचे पंजे बाहेर काढणार का? याचं उत्तर आपल्याला ३ नोव्हेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिळेल. ‘आर्या’ या सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला व सुश्मिताचीही खूप प्रशंसा झाली. सुश्मिता नुकतीच रवी जाधवच्या ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये झळकली आता तिला पुन्हा आर्याच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Story img Loader