‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुजय म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी नेहमी चर्चेत असतो. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने त्यानं एक वेगळी छाप उमटवली आहे. सध्या तो तृतीयपंथींयांवर आधारित असलेल्या ‘ताली’ सीरिजमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या सीरिजमधील त्याच्या कामाच कौतुक अजूनही केलं जात आहे. अशात सुव्रतने एका ट्रोल कमेंटवर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘दादा कोंडके, कृष्णाष्टमी आणि जीवनमरणाच्या हिंदोळ्यावर’

सुव्रत हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतोच. पण तो आपली परखड मतही व्यक्त करत असतो. अलीकडेच ‘ताली’ या वेब सीरिजनिमित्तानं ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेल दिलेल्या मुलाखती दरम्यान सुव्रतने एका ट्रोल कमेंटवर भाष्य केलं. त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – “समोरच्याला सांगू दे, मला मराठी येत नाही मग…” मराठी भाषेच्या अभिमानाबाबत ‘सुभेदार’ फेम अजय पुरकर स्पष्टच बोलले

हेही वाचा – “लोक खूप श्रीमंत झाल्यावर स्वतःसाठी बंगले घेतात पण मी…”; ‘ताली’ फेम सुव्रत जोशीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

सुव्रत म्हणाला की, “एक ट्रोलिंग कमेंट होती, जी अशी होती की, तुम्ही आता जागे झालात का? तुम्ही पण असे स्लमडॉग मिलेनियर सारखे चित्रपट करायला लागलात का? की, भारतात तृतीयपंथावर कसा अन्याय होतो. परदेशातही होतो वगैरे वगैरे. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी त्यावर लिहिणार होतो. पण मी लिहीलं नाही. मला असं वाटल वेब सीरिज येऊ दे. सीरिजमधूनच जे काही बोललं जाईल. पण तुम्हाला असं वाटत असेल की, परदेशात असे लढे द्यावे लागले नाहीत, तर ते अतिशय चुकीचं आहे. तिथेही लढे द्यावे लागले होते.

हेही वाचा – Video: अभिजीत बिचुकलेंची ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर हजेरी; इंग्रजी ऐकून अवधूत गुप्ते झाला थक्क

पुढे सुव्रत म्हणाला की, ” यावर ‘मिल्क’ नावाचा अप्रतिम चित्रपट आला होता. त्यात शॉन पेनने काम केलं होतं. दहा वर्षांपूर्वीचा हा चित्रपट असले. अमेरिकेतील गे राइटचा पहिला लढा ज्यांनी दिला, त्या हार्वे मिल्क माणसाविषयीचा हा चित्रपट आहे. तो इतका अप्रतिम चित्रपट आहे. त्यावेळी अमेरिकन व्यवस्थेसाठी आणि कायदेशीर दृष्टीने सुद्धा ही गोष्ट क्लिष्ट होती. पण त्याला खूप पुरस्कार मिळाले. अमेरिकेतही आणि जागतिक स्तरावरही पुरस्कार मिळाले आहेत. पण परदेशातले लोक तुम्ही इकडची गरीबी दाखवली म्हणून ते पाहतात, असं नाही. तिथलंही वास्तव दाखवलं तरी तितकंच धाडसीपणे ते स्वीकार करतात.”

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taali fame actor suvrat joshi react on this troll comment pps
Show comments