गेले अनेक दिवस अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ‘ताली’ या वेब सीरिजची सर्वत्र खूप चर्चा होती. अखेर ही वेब सीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली आहे. ताली ही वेब सिरीज तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या वेब सिरीजला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिरीजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. तर यामध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. तर गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखची पत्नी अभिनेत्री कृतिका देव हिने साकारली आहे. या सिरीज मध्ये काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता हे आता तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा : “अजिबात सोपं नाही…”, सुश्मिता सेनने सांगितला मराठी कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली, “ते सगळे…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “तृतीयपंथींचं जीवन आणि त्यांच्या अडचणींबाबत आपल्याकडे फारसं बोललं जात नाही. त्यामुळे या सीरिजच्या ऑडिशनसाठी जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. श्रीगौरी सावंत यांचा जीवनप्रवास आणि सामाजिक कार्य खूप मोठं आहे. या सिरीजमध्ये त्यांच्या बालपणीची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी मोठी संधी होती. रवी जाधव यांच्यासारखे आघाडीचे दिग्दर्शक, क्षितीज पटवर्धन यांच्यासारखा लेखक असल्यामुळे हा नाजूक विषय तितक्याच नाजूकपणे हाताळला जाणार याची खात्री होती.”

हेही वाचा : सुश्मिता सेनची प्रमुख भूमिका, तर जावई सुव्रत तृतीयपंथीयाच्या भूमिकेत…; ‘ताली’ पाहून शुभांगी गोखले म्हणाल्या…

पुढे ती म्हणाली, “सुष्मिता सेन यांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटले तेव्हा मला थोडं दडपण आलं होतं पण त्यांनी मला कम्फर्टेबल केलं आणि मिठी मारली. या सिरीजमधील काही सीन्सचं शूटिंग करण्यासाठी आम्ही तृतीयपंथीयांच्या वस्तीत गेलो. तिथे गेल्यावर माझे सगळे गैरसमज पुसले गेले. त्यांच्यात आणि आपल्यात कुठलाही भेदभाव न करता ते आपल्यातलेच आहेत हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आपण आणि ते असं म्हणणं सोडून सगळेच समान आहेत हा विचार आचरणात आणण्याची गरज आहे. तिथे गेल्यावर मला त्यांचं जीवन जवळून पाहता आलं त्यामुळे हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे.” याचबरोबर आता सोशल मीडियावरून तिच्या कामाचं, या सिरीजचं खूप कौतुक होत आहे त्यानेही ती भारावली असल्याचं तिने सांगितलं.