अभिनेता सुव्रत जोशी आपल्या दमदार अभिनयामुळे मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं हिंदी मनोरंजनसृष्टीतही उत्कृष्ट अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अलीकडेच त्यांची ‘ताली’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. या वेब सीरिजमधील त्याच्या कामाच अजूनही कौतुक होत आहे. असा हा हरहुन्नरी सुव्रत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. व्हिडीओ, फोटो यापलिकडे तो स्वतःची परखड मत व्यक्त करत असतो. नुकतीच त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा – Video: अभिजीत बिचुकलेंची ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर हजेरी; इंग्रजी ऐकून अवधूत गुप्ते झाला थक्क
सुव्रतने बँकॉकमधील भाजी मंडईचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यानं भाजी मंडई या त्याच्या आवडीच्या विषयावर लिहीलं आहे. सुव्रतने लिहीलं की, “जगात कुठेही गेलं की मला साद घालते ती तिथली मंडई. अगदी लंडनमध्ये असताना देखील हॅमरस्मिथ (Hammersmith) मार्केटमध्ये जाणे हा माझा दिवसातील अत्यंत आनंदाचा भाग. बऱ्याच लोकांना बॅगा, घड्याळे, कपडे, अत्तर या अशा गोष्टींची भुरळ पडते. मला स्थानिक भाज्या, फळे, मसाले, फुले वगैरे यांची. एकदा माझ्या एका अभिनेत्री असलेल्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत होतो आणि विषय निघाला. तर मी तिला म्हटलं, मला कितीही लोक ओळखू देत, माझ्या आनंदासाठी मी शेवटपर्यंत मी भाजी बाजाराला जाणार. लोक खूप श्रीमंत अथवा प्रसिद्ध झाल्यावर स्वतःसाठी बोटी, बंगले घेतात…मी कदाचित स्वतःचा भाजी बाजार उभा करीन. प्रत्येक ठिकाणच्या भाजी बाजारात गेल्यावर तेथील लोकांच्या जगण्याविषयी, खाद्य संस्कृती विषयी जे साक्षात्कार होतात ते टुरिस्ट ब्लॉगवर मिळणाऱ्या सल्ल्यांमधील खानावळीत जाऊन होत नाहीत.”
हेही वाचा – “…यामुळे पहिल्याच टेकमध्ये दहीहंडी फोडू शकले”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला किस्सा
पुढे सुव्रतने लिहीलं की, “एक गोष्ट नक्की की काही अपवाद वगळता प्रत्येक ठिकाणी लोक त्यांच्या प्रकृतीनुसार आहार घेतात. तो सुयोग्य असतो. भारताइतके उत्कृष्ट शाकाहारी जेवण कुठेही मिळत नाही. त्यात भारत मला तरी एक नंबर वाटतो. पण म्हणून केवळ आपल्याकडेच फक्त शास्त्रीय पद्धतीने अन्नग्रहण होते हे काही खरे नाही. तसे ते जवळ जवळ प्रत्येक ठिकाणी होते. पुन्हा मांसाहारबद्दल आपल्या इथे अनेक अशास्त्रीय गैरसमज पसरवले गेले आहेत. शाकाहार उत्तमच! परंतु विशिष्ट मांस खाल्ले की स्खलन होते वगैरेला छेद देणाऱ्या गोष्टी ढळढळीतपणे दिसून येतात. अन्यथा दिवसरात्र मांसाहार करणारे देश आपल्या तुलनेत अत्यंत आनंदी, शांततापूर्ण, सभ्य, शीलवान कसे आहेत? भूतान हे त्यातील एक अत्यंत महत्त्वाचे उदाहरण, थायलंडमध्ये देखील तोच अनुभव! असो. खऱ्या अध्यात्मिक प्रगतीसाठी भय, लज्जा, घृणा यापासून मुक्त होणे आवश्यक असते असे म्हणतात. विविध ठिकाणचे हे खाणे पिणे पाहिले, त्यातील काही करून पाहिले की आपले पूर्वग्रह काहीसे सैल नक्की होतात आणि भय,लज्जा किंवा घृणा याच्या थोडे पलीकडचे दिसते हे नक्की. त्या अर्थाने भाजी घेणे किंवा किडे खाऊन पाहणे हा माझ्यासाठी अध्यात्मिक अनुभव आहे.”
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानला दिलंय ‘हे’ भन्नाट नाव; जाणून घ्या
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुव्रताचा नाकतोडे, रेशीमकिडे, रातकिडे खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं लिहीलं होतं की, “हा जेवणाचा व्हिडिओ जेवताना बघू नये. किड्यामुंगीसारखे जगण्यापेक्षा कधीतरी त्यांना खाऊन बघावे म्हटलं. खाताना आधी हातापायाला मुंग्या आल्या आणि नंतर डोक्यात भुंगा. किडे खाऊन मी माती खाल्ली का?”