२००७ मध्ये आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांच्या माध्यमातून त्याने नवा प्रयोग करुन पाहिला होता. त्याच्या या प्रयत्नाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्याने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक ईशान अवस्थी या शाळेमध्ये जाणाऱ्या मुलाभोवती फिरते. रंगाच्या दुनियेमध्ये वावरणाऱ्या ईशानला शाळा, अभ्यास अशा गोष्टींमध्ये फारसा रस नसतो.अभ्यास करताना अडचणी येत असतात. पुढे त्याला एक शिक्षक भेटतो आणि त्या शिक्षकामुळे त्याचे आयुष्य बदलते.

या चित्रपटामध्ये दर्शील सफारी या बालकलाकाराने ईशान अवस्थी ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. तर आमिरने त्याच्या शिक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. या चित्रपटामुळे दर्शील खूप लोकप्रिय झाला. पुढे त्याने ‘बम बम बोले’, ‘झॉकोमॉन’ अशा काही चित्रपटांमध्ये काम केले. पण या चित्रपटांना ‘तारे जमीन पर’प्रमाणे यश मिळाले नाही. यानंतर त्याने चित्रपटांपासून ब्रेक घेत शिक्षण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले. काही वर्षांनंतर त्याने यूट्यूब व्हिडीओमध्ये काम करायला सुरु केली. दर्शील आता ओटीटी विश्वामध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘कॅपिटल ए स्मॉल ए’ (Capital A small a) या लघुपटाची घोषणा करण्यात आली होती.

Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mission Ayodhya movie
‘मिशन अयोध्या’ वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
pataal lok season 2 trailer
Pataal Lok 2 Trailer: जबरदस्त गूढ, अ‍ॅक्शन आणि ‘ती’ तारीख…, ‘पाताल लोक २’ चा ट्रेलर प्रदर्शित

आणखी वाचा – “तुम्ही मला कायमच…” सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर लेकीची पोस्ट

नुकताच या लघुपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. या लघुपटामध्ये त्याच्यासह रेवती पिल्लई प्रमुख भूमिका साकारणार आहे. तिच्याकडेही यूट्यूब व्हिडीओ आणि सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. ट्रेलर पाहिल्यावर हा लघुपट स्कूल रोमान्स या श्रेणीमधला आहे हे लगेच लक्षात येते. त्यासह या लघुपटामध्ये किशोरवयीन मुलांना असणाऱ्या मानसिक समस्यावरही भाष्य केल्याचे त्यामध्ये पाहायला मिळते. सुमित कुमार सुरेश यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.

आणखी वाचा – हॉलिवूड स्टार ब्रॅड पीटने वापरलेल्या कमोडचा फोटो अनुराग कश्यपने केला शेअर; म्हणाला…

लघुपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, “समाजाचा प्रभाव आपल्यावर होत असतो. लोक काय म्हणतील किंवा समाजामध्ये बदनामी होईल या विचाराने अनेक नातेसंबंध उध्वस्त होतात. ‘कॅपिटल ए स्मॉल ए’मधून तयार झालेली ही भावना बदलण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.” हा लघुपट १७ नोव्हेंबर रोजी अ‍ॅमेझॉन मिनीटिव्हीवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader