विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘खुफिया’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये तब्बू आणि अली फजलच्या फारच रहस्यमय भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे, जो एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात तब्बू रॉ एजंट बनली आहे, तर अली फजल एका देशद्रोहीच्या भूमिकेत आहे, जो रॉमध्ये राहून महत्त्वाची माहिती बाहेरील व्यक्तिला पुरवत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा ट्रेलर चाहत्यांना चांगलाच आवडला असून तो पाहताना कथानकाचं गांभीर्य अन् त्यातील सस्पेन्स हा लोकांना चांगलाच बांधून ठेवणारा आहे. ट्रेलरमध्ये तब्बू ही देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या लोकांना पकडण्याचा निर्धार केलेल्या एका एजंटची भूमिका निभावत आहे.

आणखी वाचा : ओठात सिगारेट, हातात लायटर; रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’मधील डॅशिंग लूक चर्चेत; ‘या’ दिवशी येणार टीझर

‘एस्केप टू नोव्हेअर’ नावाच्या पुस्तकावर ‘खुफिया’ हा चित्रपट बेतलेला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच रॉचे अधिकारी संभाव्य गळतीबद्दल बोलताना दिसत आहेत. गुप्तहेराची भूमिका करणारी तब्बू एका धोकादायक मोहिमेवर गेल्याचं स्पष्ट होतं. देशाच्या विरोधात जाणारा RAW मध्ये घुसखोर कोण असू शकतो हे शोधण्याचा ती प्रयत्न करत आहे.

तब्बूचा संशय अली फजलच्या व्यक्तिरेखेवर असल्याचंही यातून स्पष्ट होत आहे. विशाल भारद्वाज यांचा हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना हा ट्रेलर चांगलाच पसंत पडला असून या सस्पेन्स थ्रिलरसाठी ते चांगलेच उत्सुक असल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tabbu ali fazal starrer vishal bhardwarj director khufiya trailer out now avn