तमन्ना भाटिया तिच्या ‘जी करदा’ आणि ‘लस्ट स्टोरीज २’या वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. एक आठवड्यापूर्वीच तमन्नाने विजय वर्माबरोबरच्या नात्याबाबत कबुली दिली. सध्या तमन्ना तिच्या आगामी ‘लस्ट स्टोरीज २’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याकरीता अभिनेत्रीने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “कुंदनला रोखलंत, पण शंकरला कसं थांबवाल?” ‘रांझना’च्या सिक्वेलची घोषणा, धनुषच्या लुकने वेधलं लक्ष

तमन्नाला विजय वर्मामधील कोणता गुण तुला सर्वात जास्त आवडतो किंवा त्याच्यात काय आकर्षक वाटते? असा प्रश्न ‘मिर्ची प्लस’च्या मुलाखतीत विचारण्यात आला यावेळी क्षणाचाही विलंब न करता अभिनेत्री म्हणाली, “सर्वकाही…तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये आकर्षक वाटणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत.” पुढे तमन्ना लग्नाविषयी सांगताना म्हणाली, “माझा लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. लग्न करताना तुम्हाला केवळ एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण कुटुंबाची निवड करावी लागते. जर तुमच्या जोडीदाराकडे त्याचे कुटुंब नसेल, तर तुम्हाला त्याचे कुटुंब व्हावे लागते.”

हेही वाचा : ‘भूल भुलैय्या २’ ते ‘सत्यप्रेम की कथा’ कार्तिक-कियाराच्या मैत्रीत असा झाला बदल; अभिनेत्री म्हणाली, “आधी त्याला खूप ओरडायचे अन् आता…”

विजय वर्माविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, “तो अशी व्यक्ती आहे की, ज्याच्याबद्दल मला मनापासून काळजी वाटते. आमच्यातील नातं खूप खरं आणि नैसर्गिक असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा खोटेपणा नाही. त्याच्याबरोबर वेळ कसा जातो हेच मला कळत नाही.”

हेही वाचा : “जलेगी तेरे बाप की…” ‘आदिपुरुष’ मधील ‘ते’ वादग्रस्त संवाद अखेर बदलले; आता चित्रपटात हनुमानजी बोलणार…

दरम्यान, तमन्नाची ‘जी करदा’ ही ८ भागांची रोमॅंटिक ड्रामा असलेली वेब सीरिजचे अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, यामध्ये अभिनेत्रीसह सुहेल नय्यर, आशिम गुलाटी आणि अन्या सिंह हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच‘लस्ट स्टोरीज २’मध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्याशिवाय काजोल, नीना गुप्ता आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamannaah bhatia reveals boyfriend vijay varma most attractive quality sva 00