‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चंचल तरुणी ते सोज्वळ सुन अशा विविध प्रकारच्या भूमिका तिने मालिकांमधून साकारल्या आहेत. मात्र दमदार अभिनय करण्याची क्षमता असतानाही केवळ छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणून तिला वेबसीरिजसाठी नाकारण्यात आले आहे होते यावरच तिने आता भाष्य केलं आहे.
शुभांगी टीव्ही पडद्यावर प्रेक्षकांची मन जिंकल्यावर आता ओटीटी माध्यमावर पदार्पण करत आहे. ती सध्या बेकाबु या फँटसीवर आधारित असलेल्या वेबसीरिजमध्ये दिसत आहे. नुकत्याच इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने आपली खंत व्यक्त केली आहे. ती असं म्हणाली, “अनेक टीव्ही कलाकार सध्या वेबसीरिजमध्ये उत्तम काम करत आहेत. एक टीव्ही अभिनेत्री म्हणून याचा मला अभिमान आहे. पण असे काही लोक आहेत जे तुम्हाला वेबशोज मध्ये घेऊ इच्छित नाहीत. कारण आधीच आम्ही प्रसिद्ध झालेलो आहोत.”
ती पुढे म्हणाली, “तुम्ही टीव्हीवरील एक प्रमुख चेहरा असल्याने आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही असे सांगितले जाते. अलीकडेच माझ्याबाबतीत एक गोष्ट घडली. त्यांना माझे काम खूप आवडले पण त्यांनी निष्कर्ष काढला की तू एक ओळखीचा चेहरा आहेस. मला ती भूमिका करायची होती पण मी टीव्हीवरील प्रसिद्ध कलाकार असल्याने ती करू शकले नाही. मात्र इतर लोकांना तुमच्यातील क्षमता ठाऊक असते त्यांना तुमच्याबरोबर काम करायचे असते.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध आहे. २००९ साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘ये प्यार तुने क्या किया’, ‘लव्ह बाय चांस’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘खेलती है जिंदगी आँख मिचोली’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.