बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. ‘थँक गॉड’मध्ये तो चित्रगुप्ताची भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटात अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीतची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या परंतु गेल्या तीन दिवसात फारशी चांगली कमाई करू शकला नाही. त्यानंतर हा चित्रपट आता ओटीटी आणण्याच्या तयारीत निर्माते आहेत.
आणखी वाचा : “माझ्या सासूबाई माझ्यासाठी…”, कतरिना कैफने सांगितले लग्नानंतरच्या तिच्या फिटनेसचे रहस्य
सुमारे ७० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या दिग्दर्शक इंद्र कुमारच्या ‘थँक गॉड’ने पहिल्या दोन दिवसांत सुमारे १३ कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिसवर व्यवसाय केला. तसेच तिसऱ्या दिवशी फक्त चार कोटींचे कलेक्शन झाल्याची माहिती आहे. मात्र या गतीने थिएटरवर अवलंबून राहून चित्रपटाचा खर्च वसूल करणे शक्य नसल्याचे निर्मात्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच आता हा चित्रपट लवकरात लवकर ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणण्याची तयारी सुरू आहे.
अजय देवगणचा हा चित्रपट महिनाभरात प्रेक्षकांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ‘थँक गॉड’ चित्रपटगृहांमधून बाहेर पडेल असे सांगण्यात येत आहे. चित्रपटगृहांनंतर अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत यांची भूमिका असलेला हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर रिलीज होणार आहे.
हेही वाचा : अजय देवगणपेक्षा सिद्धार्थ मल्होत्रा ठरला सरस, ‘थँक गॉड’ चित्रपटातील अभिनयावर प्रेक्षक फिदा
थिएटरमध्ये किमान चार आठवडे हा चित्रपट चालवण्यात येईल. ही मुदत संपल्यानंतर ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर ‘थँक गॉड’ रिलीज करण्याची निर्मात्यांची योजना आहे. सर्व काही ठरलेल्या नियोजनानुसार झाले तर ‘थँक गॉड’ २२ नोव्हेंबर किंवा त्याच्या आसपासच्या ओटीटीवर येईल.