अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी लेक खुशी कपूर ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. सुहाना, अगस्त्य आणि खुशी यांच्या चित्रपटातील लुकबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा : पतीवर सेक्स स्कॅण्डलचा आरोप अन्…; ‘द ट्रायल…’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित, काजोलचे ओटीटीवर दमदार पदार्पण
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द आर्चीज’चित्रपटाचे पोस्टवर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर, डॉट, वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा असे नवोदित कलाकार दिसत आहेत.
हेही वाचा : तू पनौती आहेस” विराट कोहली बाद झाल्यावर नेटकरी अनुष्का शर्मावर संतापले, अभिनेत्रीला केले ट्रोल
‘द आर्चीज’चित्रपटाचे कथानक १९६० च्या दशकातील आहे. त्यामुळे पोस्टरमध्ये सगळ्या कलाकारांचा रेट्रो लुक पाहायला मिळत आहे. “पोस्टरमध्ये सुहाना खान, खुशी कपूर सहज ओळखता येत आहेत परंतु अगस्त्य नंदाला पटकन ओळखता येत नाहीये” अशा कमेंट्स काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. नेटफ्लिक्सवर रिलीज होणार्या ‘द आर्चीज’ चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर नेटकऱ्यांनी या स्टारकिड्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले आहे की, पुन्हा एकदा नेपोटीजम… यांना ऑडिशन न देता रोल कसे मिळतात?, तर दुसऱ्या एका युजरने “सुहाना या रोलसाठी योग्य नाही” अशी कमेंट केली आहे.
चित्रपटाचे संपूर्ण कथानक प्रसिद्ध अमेरिकन कॉमिक ‘द आर्चीज’वर आधारित आहे. दिग्दर्शक झोया अख्तरने कॉमिक बुकमधील पात्रांना भारतीय लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, ‘द आर्चीज’ चित्रपटाची संपूर्ण टीम ब्राझीलमध्ये १६ ते १८ जूनला होणाऱ्या नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. यावेळी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.