‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. धर्मांतराद्वारे काही महिलांना मुसलमान करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले गेले, त्यांची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. या चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर लवकरच हा चित्रपट ओटीटीवरदेखील प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटातील ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचे दावे खोटे आहेत आणि हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. मात्र चित्रपटगृहात तो चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.५ कोटी, दुसऱ्या दिवशी जवळपास १२ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १६.५ कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ३५.७५ कोटींची कमाई केली.

आणखी वाचा : पहिल्या दिवशी ७.५ कोटींची कमाई करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ बनवण्यासाठी आला मोठा खर्च, चित्रपटाच्या बजेटचा आकडा समोर

चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘झी5’ने या चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत. याचबरोबर हा चित्रपट थिएटर रिलीजच्या चार ते सहा आठवड्यांनी ओटीटीवर प्रदर्शित होईल. त्यानुसार हा चित्रपट साधारण जूनच्या तिसऱ्या आठवड्यात झी5 वरून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केलेली नाही.

हेही वाचा : शिक्षण अर्धवट सोडून अभिनय क्षेत्रात आलेली ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या तिची संपत्ती

या चित्रपटावरून गेले काही दिवस वाद सुरू आहे. तर नुकतीच तमिळनाडूमधील चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. तमिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. तरी हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story will be stream on zee5 ott platform from third week of june rnv