The Sabarmati Report OTT Release: आजकाल प्रत्येक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. चित्रपटगृहात धुमाकूळ घातलेला चित्रपट काही दिवसांत तुम्ही ओटीटीवर घरबसल्या पाहून शकता. आता विक्रांत मेस्सीचा सत्य घटनेवर आधारित असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. पण कधीपासून, कुठे? ते जाणून घ्या…

अभिनेता विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विक्रांतसह अभिनेत्री रिद्धि डोगरा आणि राशि खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. २००२मध्ये गुजरातच्या गोध्रा हत्याकांडवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाची स्क्रीनिंग खास संसदेमध्ये ठेवली आहे. पंतप्रधान मोदींसह सर्व मंत्र्यांनी एकत्र ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहायला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होण्यासाठी तयार झाला आहे.

suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
tharla tar mag director sachin gokhale reveals upcoming twist
सायलीच ‘तन्वी’ आहे हे सत्य कधी कळणार? ‘ठरलं तर मग’च्या दिग्दर्शकाचा खुलासा, मालिकेत लवकरच येणार मोठा ट्विस्ट
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
zee marathi paaru and lakshmi niwas mahasangam new twist
लग्न, गैरसमज अन् कारस्थान…; ‘झी मराठी’च्या दोन मालिकांचा महासंगम! आठवडाभर काय घडणार? वाचा…
ISS Mahakumbh
Mahakumbh 2025 : लखलखता महाकुंभ! रात्रीच्या अंधारात उजाळून निघालीय गंगा नदी; अंतराळातून काढलेले फोटो तर पाहा!
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…
thane transport minister Pratap sarnaik said it is necessary to increase fare of st every year
एसटीची भाडेवाढ दरवर्षी होणे गरजेचे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

हेही वाचा – Video: नमक इस्क का…; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याच्या पत्नीचा बिपाशा बासूच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटात ग्रोधा हत्याकांडच्यावेळी पत्रकारांची भूमिका, विरोधकांचे प्रयत्न, इतिहास, प्रसारमाध्यमांची भूमिका आणि राज्याचे चित्र पाहायला मिळतं. शिवाय गोध्रा घटनेचे खरे गुन्हेगार कोण? याचा खुलासा चित्रपटातून करण्यात आला. ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ZEE5वर हा चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन धीरज सरना यांनी केलं होतं.

हेही वाचा – Video: ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीने भावाच्या लग्नात आजीबरोबर ‘झिंगाट’ गाण्यावर केलेला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी अर्जुन भांडेगांवकर, धीरज सरना, विपिन अग्निहोत्री आणि अविनाश सिंग तोमर यांनी सांभाळली होती. बालाजी मोशन पिक्चर्स, विपिन अग्निहोत्री फिल्म्स आणि विकीर फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरखाली एकता कपूर, शोभा कपूर, अंशुल मोहन आणि अमूल व्ही मोहन यांनी याची निर्मिती केली होती. तर छायांकन अमलेंदू चौधरी यांनी केलं आहे.

हेही वाचा – सूरज चव्हाण वाढदिवसाला न आल्यामुळे घनःश्याम दरवडे झाला भावुक, म्हणाला, “आम्हाला बॅनर लावायचे होते तेव्हा…”

‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करून केलं होतं. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, बनावट कथानक केवळ मर्यादीत काळापुरतंच टिकतं. त्यानंतर सत्य समोर येतंच. तुम्ही अतिशय योग्य म्हटलेलं आहे. त्या घटनेतील सत्य बाहेर येत आहे, हे चांगलंच झालं. तसंच सर्वसामान्यांनाही याची माहिती होईल. या चित्रपटानंतर विक्रांत मेस्सीने अभिनय क्षेत्रातून विश्रांती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला होता.

Story img Loader