सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नवे विषय हाताळले जात आहेत. काही कलाकारांसाठी ओटीटी हे वरदान ठरले आहे. या माध्यमामुळे त्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. ओटीटी विश्वातील ‘टिव्हीएफ’ ही वाहिनी त्यांच्या कॉन्टेंटसाठी प्रसिद्ध आहे. टिव्हीएफच्या टीमने आतापर्यंत अनेक वेब सीरिज, वेब शो आणि चित्रपटांची निर्मिती केली आहे. गंभीर विषय हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडणे ही त्यांची खासियत आहे. त्यांनी स्वतंत्र ओटीटी माध्यमदेखील सुरु केले आहे.

टिव्हीएफची ‘ट्रिपलिंग’ ही वेब सीरिज खूप गाजली. सुमीत व्यास, मानवी गाग्रू आणि अमोल पराशर हे या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. त्यांनी अनुक्रमे चंदन, चंचल आणि चितवन या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘ट्रिपलिंग’ ही शर्मा कुटुंबाची गोष्ट आहे. २०१६ मध्ये या वेब सीरिजचा पहिला सीझन यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला होता. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
emergency movie release postponed kangana ranaut
कंगना रणौत यांनी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; म्हणाल्या, “सेन्सॉर बोर्डाच्या…”
Central government notice to Netflix after controversy over IC814 web series
‘नेटफ्लिक्स’ला केंद्र सरकारची नोटीस; ‘आयसी८१४’वेबमालिकेवरून वादानंतर कारवाई
Rahul Dravid son Samit included in team india
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली संधी
rehnaa hai terre dil mein releases again in the theatres
पहिल्या नजरेत प्रेम, हिरोने लपवली ओळख अन्…; २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ रोमँटिक चित्रपट! आजही प्रत्येक गाणं आहे सुपरहिट
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा
dhanush movie rayan and kalki release on amazon ott platform
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाचा डबल धमाका; ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’चा सिक्वेल येणार?, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच रंगली चर्चा

ट्रेलरच्या सुरुवातीला चितवन वॉशरुममध्ये लघुशंका करताना दिसतो. तेवढ्यात नेमका त्यांच्या मोठ्या भावाचा, चंदनचा व्हिडीओ कॉल येतो आणि ट्रेलरची सुरुवात होते. त्या कॉलवर चंचल सुद्धा असते. व्हिडीओ कॉलवर चंदन आपले आई-बाबा घटस्फोट घेऊन वेगळे होणार असल्याची बातमी देतो. पुढे ते तिघे मिळून त्यांच्या आईवडिलांच्या घरी जातात. संपूर्ण शर्मा कुटुंब एकत्र असताना घटस्फोटाच्या बातमीवर शिक्कामोर्तब होतो. त्यावर ते तिघेही वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात. त्यानंतर कथानक पुढे जात असताना त्यात काही विनोदी सीन्स पाहायला मिळतात. कौटुंबिक नातेसंबंध हा या सीरिजचा आत्मा आहे.

आणखी वाचा – चित्रपट समीक्षणाबद्दल सैफने केलेल्या वक्तव्याला केआरकेने दिलं उत्तर; म्हणाला, “बॉलिवूडच्या नवाबला वाटतं…”

शर्मा भावंडांच्या आईची भूमिका शेरनाज पटेल यांनी, तर वडिलांची भूमिका कुमूद मिश्रा यांनी साकारली आहे. या सीझनचे दिग्दर्शन नीरज उधवानी यांनी केले आहे. तसेच अभिनयासह सुमीत व्यासने या सीझनमध्ये लेखक म्हणूनही काम केले आहे. ‘ट्रिपलिंग’चा तिसरा सीझन २१ ऑक्टोबर रोजी झी 5 या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.