‘हीरामंडी-द डायमंड बझार’ या वेब सीरिजची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजिदा शेख, शर्मीन सेगल अशी तगडी स्टारकास्ट आहे. ‘हीरामंडी’धील या अभिनेत्रींचं सध्या सगळीकडे कौतुक सुरू आहे.

‘हीरामंडी’मधील प्रत्येकीची भूमिकादेखील तशीच तोडीस तोड आहे. यातली संजिदा शेख हिने साकारलेली वहिदा भूमिकादेखील तितकीच लक्ष वेधून घेणारी ठरली. वेगवेगळ्या प्रकारचे भाव या भूमिकेद्वारे संजिदाला मांडायचे होते. चेहऱ्यावरील जखमेपासून ते तिच्या मनावर झालेल्या जखमेपर्यंतचा वहिदाचा प्रवास दाखवला होता. यादरम्यान संजिदाने अनेक मुलाखतींना हजेरी लावली होती. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत संजिदाने ती कॅमेरासमोर कशी निर्वस्त्र होते याबद्दल सांगितलं.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा… VIDEO: “ए राजाजी…”, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्रींनी केला भन्नाट डान्स, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “विरोचकाचा मृत्यू…”

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा सिद्धार्थने संजिदाला विचारलं की, “वहीदाला पडद्यावर एक कठीण प्रसंग साकारायचा होता. या सीनबद्दल तुला शंका होती का?”

यावर संजिदा म्हणाली, “नाही, मी एक अभिनेत्री म्हणून खूप निर्लज्ज झाले होते. मी कॅमेरासमोर नग्न असते. मला कधीच संकोच नसतो. पण, आता मी जे काही करतेय त्याच्याशी मला प्रामाणिक राहाचंय. मला कॅमेरासमोर प्रामाणिक राहायचंय. मला भूमिकेसाठी प्रामाणिक राहायचंय. हेच माझ्या मनात असतं.”

संजिदा पुढे म्हणाली, “मी स्वत: अशा माणसाबरोबर काम करतेय, जो स्वत:शी प्रामाणिक आहे आणि त्याला त्याचं काम आवडतं. त्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीचा नव्याने शोध घ्यायला आवडते आणि ती गोष्ट विकसित करायला आवडते.”

हेही वाचा… “शाळेतल्या एका मुलीसाठी…”, वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध गायकाने सोडलं होतं घर, म्हणाला, “मी तिच्याकडे गेलो…”

संजिदा असंही म्हणाली की “संजय सर जेव्हा सेटवर येतात तेव्हा असं वाटतं की, लहान कोणीतरी मुलगा सेटवर आलाय, ज्याला काहीतरी नवीन करायचंय. अशाप्रकारचा उत्साह नेहमी संजय सरांमध्ये असतो.”

दरम्यान, ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. ही वेब सीरिज ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहोरमधील हीरा मंडीच्या रेडलाइट जिल्ह्यातील तवायफांच्या (वेश्यांच्या) जीवनावर आधारित आहे. लवकरच या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader