संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी- द डायमंड बझार’ या वेब सीरिजची चर्चा गेल्या महिन्यापासून सर्वत्र सुरू आहे. त्यातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक सगळीकडे होतंय. अशातच अगदी कमी वेळात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री रिचा चड्ढानं तिचा या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच एका पोस्टमध्ये रिचा व्यक्त झाली होती की, एका महिन्यापूर्वी ती टीमबरोबर प्रमोशन्ससाठी कशाप्रकारे सगळीकडे एन्जॉय करत होती. एका महिन्यापूर्वी ती सात महिन्यांची गरोदर असताना तिने अनेक गोष्टी केल्या याबद्दल अभिनेत्रीने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: बाप-लेकीचं नातं नकळत खुलणार, सायली भरवणार रविराजला घास अन्…, मालिकेत येणार नवा ट्विस्ट, पाहा प्रोमो

१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ या वेब सीरिजमध्ये रिचानं लाजवंती (लज्जो) ही भूमिका साकारली आहे. आठ भागांच्या या वेब सीरिजमध्ये रिचा चड्ढाची भूमिका कमी कालावधीची असली तरी तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्येही तिनं बाकीच्या टीमबरोबर सहभाग घेतला होता.

‘हीरामंडी- द डायमंड बझार’च्या प्रमोशन्सदरम्यान रिचा सात महिन्यांची गरोदर होती. लवकरच आई होणाऱ्या या अभिनेत्रीनं अलीकडेच सोशल मीडियावर याबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीनं मनीषा कोईराला, संजिदा शेख, सोनाक्षी सिन्हा आणि इतर सहकलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला.

हेही वाचा… “जाड किंवा बारीक…”, ट्रोल झालेल्या महिलांसाठी सोनाली कुलकर्णीने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली…

रिचानं या पोस्टला कॅप्शन देत लिहिलं, ‘एका महिन्याआधी ‘हीरामंडी’चे यश साजरे करण्यासाठी आमची मीडियाशी भेट झाली होती. सर्व सहकलाकारांना भेटून मजा आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे अर्थातच संजय लीला भन्साळी होते.’

रिचाने पुढे लिहिलं, “या दिवसाची एक खास गोष्ट आहे; ज्यासाठी मी माझ्या टीमची आभारी आहे आणि मी उद्या त्याबद्दल एक रील बनविणार आहे. अजूनही विश्वास बसत नाही की, मी सातव्या महिन्यात या वेब सीरिजचं प्रमोशन करत होते, हाहाहा!”

दरम्यान, रिचा चढ्ढा आणि अली फझल यांनी २०२० मध्ये कायदेशीररीत्या लग्न केलं आणि २०२२ मध्ये त्यांचा विवाह सोहळा साजरा केला. रिचा आणि अली यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रेग्नन्सीची गुड न्यूज चाहत्यांना दिली. अभिनेत्री सध्या तिच्या तिसऱ्या तिमाहीत आहे आणि जुलैमध्ये ती गुड न्यूज देण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This bollywood actress shared her experience of a 7 month pregnancy during web series promotions dvr